जप्त खडी साठ्याचा 28 मे रोजी लिलावa

पंढरपूर LIVE 24 मे 2018



           पंढरपूर, दि. 24 :- मंगळवेढा तालुक्यात जप्त केलेल्या खडी साठ्याचा लिलाव सोमवार दिनांक 28 मे 201रोजी सकाळी 11.00 तहसिल कार्यालय मंगळवेढा येथे आयोजित केला असल्याची माहिती तहसिलदार आप्पासाहेब समिंदर यांनी दिली.
            मंगळवेढा तालुक्यात महसूल प्रशासनाने केलेल्या कारवाईत सुमारे  290.64 ब्रास  खडी साठा जप्त केला असून हा साठा अभिजीत मोरे, यांच्या मौजे पाटकळ येथील जमीन गट.नं. 392 मध्ये  ठेवण्यात आला आहे. या  ठिकाणच्या खडीसाठ्याची किंमत प्रति ब्रास रुपये 2 हजार प्रमाणे सुमारे लाख 81 हजार 280 रुपये  इतकी आहे. ज्या कोणास लिलावात भाग घ्यावावयाचा अशा व्यक्तींनी  संबधीत ठिकाणच्या खडी साठ्याची पाहणी करावी. सदर लिलावात भाग घेण्यासाठी 2 हजार रुपये विनापरतावा अर्ज फी आणि  सरकारी बोली किंमतीच्या 20 टक्के म्हणजेच  1 लाख 16 हजार 256 रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. लिलावात सर्वोत्तम बोलीची रक्कम लावलेल्या  लिलावधारकाने  संपूर्ण रक्कम तात्काळ त्याच दिवशी शासकीय खजिन्यात चलनाव्दारे जमा करावी. लिलावधारकाने लिलावाची रक्कम भरल्यानंतर स्वत:कडील वाहनाव्दारे संबधीत ठिकाणावरुन खडी घेवून जावी. लिलावात भाग घेण्या-या व्यक्तींनी नमुद ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहनही तहसिलदार आप्पासाहेब समिंदर यांनी केले आहे. 









महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments