२५ मे रोजी तहसील कार्यालय पंढरपूरवर मोर्चाचे आयोजन.

पंढरपूर LIVE 21 मे 2018


पंढरपूर - उजनी धरणातून भीमानदी पात्रात पाणी सोडणेबाबत लाभक्षेत्र विकास प्राधिकरण प्रसिद्ध केलेल्या जाहीर प्रकटीकरणामध्ये दुरुस्ती करून भीमानदी काठच्या शेतकऱ्यांना हक्काचे पाणी सोडणेबाबत तरतूद करावी. यासह इतर मागण्यासाठी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळेसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली २५ मे रोजी तहसील कार्यालय पंढरपूर येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी पंढरपूर यांना देण्यात आले. 

    प्रकटन दुरुस्त करून भिमानदीला पाणी सोडण्याबरोबर तालुक्यातील शेतीपंपांना पूर्ण दाबाने ८ तास विधुत पुरवठा करणेत यावा. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची गळती थांबविणेसाठी फायबरचे दरवाजे बसविण्यात  यावे या मागणीसाठी तहसील कार्यालय पंढरपूर वर होणाऱ्या मोर्चामध्ये सर्व शेतकरी बांधवानी सहभागी व्हावे असे आवाहन काळे यांनी केले.

याप्रसंगी सहकार शिरोमणीचे संचालक दिनकर चव्हाण,सुधाकर कवडे, मोहन नागटिळक, युवराज दगडे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे चेअरमन विष्णू यलमर, नितीन पवार, गणेश ननवरे, प्रकाश गायकवाड, कांतीलाल गलांडे आदी.  










महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments