भावगीतांच्या नभांगणात तळपणारा शुक्रतारा लोपला... मराठी संगीत क्षेत्राला अजरामर भावगीतांचं मौल्यवान देणं देणारे जेष्ठ गायक अरूण दाते यांचं निधन...

पंढरपूर LIVE 6 मे 2018
सुप्रसिद्ध गायक अरूण दाते यांनी आज सकाळी 6 वाजता कांजुरमार्ग येथे राहत्या घरी वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अजरामर भावगीतांचं देणं दिलेला हा महान गायक आज जगाला सोडून गेला.
त्यांच्या जीवनप्रवासावर एक नजर...
अरुण दाते (जन्म : ४ मे, इ.स. १९३४ - मृत्यू : ६ मे, इ.स. २०१८ ) हे एक मराठी भावगीत गायक होते. अरुण दातेंचे वडील रामूभैय्या दाते हे इंदूरमधील प्रतिष्ठेचे गायक होते. त्यांच्या इच्छेनुसार अरुण दाते गायक झाले. अरुण दाते इंदूरजवळच्या धारला कुमार गंधर्वांकडे सुरुवातीला गाणे शिकले. त्यांनी पुढील शिक्षण के. महावीर यांच्याकडे घेतले.
अरुण दाते १९५५पासून आकाशवाणीवर गाऊ लागले. वयाच्या पन्नाशीत त्यांनी भावगीतांवर आपले लक्ष केंद्रित केले. १९६२मध्ये शुक्रतारा मंदवारा ह्या पहिल्या गीताची ध्वनिमुदिका प्रकाशित झाली. हे गाणे त्यांनी गावे यासाठी संगीत दिग्दर्शक त्यांना आग्रह करीत. आपण हिंदीभाषिक प्रदेशातील असल्याने मराठी उच्चार शुद्ध नसल्याचे कारण सांगून दाते यांनी सुरुवातीला तीन वर्षे ते गाण्याचे टाळले. शेवटी एकदा ते ध्वनिमुद्रित झाले आणि अफाट गाजले. पुढे अरुण दाते आपल्या कार्यक्रमांतही ‘शुक्र तारा’ गाऊ लागले. इ.स. २०१०पर्यंत अरुण दाते यांचे शुक्रतारा या नावाने होणार्या मराठी भावगीत गायनाचे २५००हून अधिक कार्यक्रम झाले आहेत. त्यांचे उर्दूतील आणि मराठीतील गीतांचे पंधराहून अधिक आल्बमही लोकप्रिय आहेत. मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते या अनुक्रमे कवी, संगीत दिग्दर्शक आणि गायक या त्रिकुटाने मराठी भावगीताला परत लोकप्रियता प्राप्त करून दिली असे म्हणले जाते.
अरुण दाते यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, सुधा मलहोत्रा, कविता कृष्णमूर्ती यांबरोबर द्वंद्वगीते गायली आहेत.
- अरुण दाते यांनी ‘शतदा प्रेम करावे’ या नावाचे एक आत्मचरित्र लिहिले आहे. हे पुस्तक पूर्वी १९८६ साली प्रसिद्ध झाले होते, पण बाजारात मिळत नसल्याने नव्याने प्रकाशित होत आहे. (२६-५-२०१६)
- अरुण दाते यांनी ‘शुक्रतारा’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले असून त्याचे शब्दांकन सुलभा तेरणीकर यांचे आहे, अशी बातमी होती, पण तिची सत्यता पडताळून पाहता आली नाही. बातमी अनेक ठिकाणी वाचायला मिळाली होती.
- सुरेश ठाकुर यांचाही ‘शतदा प्रेम करावे’ याच नावाचा ललित लेखसंग्रह आहे.
- पहिला गजाननराव वाटवे पुरस्कार (इ.स.२०१०)
- शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार (२०१६)
- खालील संकेतस्थळावर ऐका अरूण दाते यांची गाणी
- https://www.aathavanitli-gani.com/Swar/Arun_Date
(माहिती,साभार-विकीपिडीया)






महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments