पंढरपूर LIVE 17 मे 2018
केंद्रिय भुपृष्ट, परिवहन मंत्री नितीन गडकरी येणार- संजय वाईकर
पंढरपूर- केंद्र सरकारच्या भुपृष्ट मंत्रालयाच्या वतीने पालखी मार्गाच्या रुंदिकऱणाचे काम हाती घेण्यात आले असून लवकरच या कामाची सुरुवात होण्याचीशक्यता आहे. आषाढी यात्रेपुर्वी या कामाची केंद्रिय भुपृष्ट व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या कामाचे भुमिपूजन होणार आहे. अशी माहिती पंढरपूरशहर भाजपाचे अध्यक्ष संजय वाईकर यांनी दिली.
दि. 12 मे रोजी केंद्रिय भुपृष्ट परिवहन, रस्ते विकास व जलसंधारणमंत्री नितीन गडकरी हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे येथे आले असताना पंढरपूर शहरभारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संजय वाईकर यांनी त्यांना पालखी मार्गाच्या रुंदिकरणाच्या कार्यक्रमाचे भुमिपूजन आषाढी यात्रेपुर्वी केले जावे अशी मागणी केलीहोती. यावेळी प्रत्यक्ष भेटीमध्ये बोलताना केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित अधिकार्यांना तातडीने आदेश देवून या कामामध्ये गती निर्माण करावी वआषाढी यात्रेपुर्वी या पालखी मार्गाच्या रुंदिकरणाचे काम सुरु व्हावे असे सांगितले आहे. त्यामुळे आषाढी यात्रा सुरु होण्यापुर्वी या कामाचे भुमिपूजन होणारअसल्याचे वाईकर यांनी सांगितले.
पुणे येथे गडकरी यांना भेटून वाईकर यांनी याबाबतचे एक निवेदन सादर केले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, आळंदीहून येणारी श्री संत ज्ञानेश्वरमहाराजांची पालखी व देहूहून येणारी संत तुकाराम महाराजांची पालखी या पालखी मार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय आपल्या खात्याने घेतला आहे. पंढरीतयेणार्या लाखो भाविकांना पायी वारी सुखाची व्हावी व त्यांचा प्रवासही सुखकर व्हावा यासाठी या मार्गाचे रुंदिकरण करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळेवारकरी भक्तांमधून सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले जात असून भविष्यामध्ये शासनाचा हा निर्णय वारकर्यांच्या दृष्टीने अत्यंत चांगला असा ठरणारअसल्याने त्यांच्यामधून
समाधान व्यक्त होत आहे.
त्यामुळे वारकरी सांप्रदाय या निर्णयाचे स्वागत करीत आहे. सोमवार दि. 23 जुलै 2018 ला पंढरपुरात आषाढी यात्रेचा सोहळा होणार आहे. गेल्या काही वर्षापासूनया सोहळ्यासाठी उपस्थित राहणार्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. 15 ते 17 लाखाच्या घरात सध्या यात्रा भरताना दिसून येते. आषाढीएकादशीच्या आधी पंधरा दिवसापासूनच यात्रेची तयारी सुरु झालेली असते. 16 दिवस आधी पालख्या आपापल्या स्थानापासून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत असतात.त्यामुळे 1 जुलै पुर्वीच या कामाचा शुभारंभ होणे महत्वाचे आहे. हे मंत्रीमहोदयांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने याबाबतचे आदेश संबंधित अधिकार्यांना दिले असल्याचे वाईकर यांनी सांगितले. केंद्राच्या भुपृष्टमंत्रालयाच्या वतीने पालखी मार्गाचा डिपीआर पूर्ण झाला असून पुढील कामालाही त्वरीत सुरुवात होईल असे सांगितले जात आहे. त्यामुळे आषाढी यात्रेपूर्वीमहाराष्ट्रातील भाविकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या ठरणार्या या पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाचा शुभारंभ यात्रेपुर्वी करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com







0 Comments