पंढरपूर LIVE 11 मे 2018
पंढरपूर ः दि.11 - आज दि.11.05.2018 रोजी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांचे समवेत जिल्हाधिकारी, सोलापूर व पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार तसेच पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता श्री चौगुले यांचे समवेत नदीला पाणी सोडणेबाबत जाहीर प्रकटन करणेबाबत चर्चा झाली. पाणी न सोडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असल्यामुळे आमदार श्री भालके यांनी आंदोलनाचा इशाराही दिला.
सदर चर्चेमध्ये आमदार श्री भालके यांनी अधिकार्यांना विचारले की, आपण जाहीर प्रकटन का केले नाही व ते कधी करणार आहात त्यावर जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता श्री चौगुले यांनी जाहीर प्रकटन करण्याचे मान्य करून दि.12.05.2018 रोजी वर्तमानपत्रामध्ये जाहीर करून नदीला पाणी सोडण्याचे मान्य केले.
सदरचे पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे.सदर वेळी श्री विठ्ठल कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री लक्ष्मणआबा पवार, संचालक श्री दिनकरबापू पाटील, श्री विलासनाना देठे तसेच श्री दौलतराव शिंदे, श्री दिपक सदाबसे व श्री संतोष सुळे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments