चंद्रभागा नदीवरील घाटाची जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्याकडून पहाणी

पंढरपूर LIVE 11 मे 2018


पंढरपूर दि.11 :- शासनाच्या वतीने संत तुकाराम महाराज  जन्मचतु: शताब्दी कार्यक्रमातंर्गत विप्र दत्त घाट ते चंद्रभागा घाट  येथे  15  मिटर  बांधण्यात आलेल्या नवीन घाटाची  पाहणी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी केली.
या पाहणी प्रसंगी आमदार भारत भालके, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, प्र. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविण सांळुखे, प्रांतधिकारी सचिन ढोले, जलसंपदाचे अधिक्षक अभियंता शिवाजी चौगुले, तहसिलदार मधुसूदन बर्गे,  न.पाचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, बांधकाम विभागाचे हनुमंत बागल याच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
संत तुकाराम महाराज  जन्मचतु: शताब्दी कार्यक्रमातंर्गत विप्र घाट, चंद्रभागा घाट, कासार घाट, कुंभार घाट, हरिदास घाट व उध्दव घाट या घाटांचे काम कुशल कारागिराच्या सहाय्याने  करण्यात येणार आहे. या साठी विशिष्ठ प्रकारचा दगडाला घडवून चुन्याचा वापर करुन  बांधकाम करण्यात येणार आहे. 
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी संबधित अधिका-यांकडून माहिती घेवून आवश्यक सुचना दिल्या. तसेच नवीन ड्रेनेज निश्चितीबाबत जलसंपदा विभाग, नगरापालिका,  शासकिय अभियांत्रिकी विद्यालय, जलसंपदाचे तांत्रिक सल्लागार यांनी समन्वाने काम करण्याबाबतच्या सुचना दिल्या. तसेच 65 एकर एकर येथे सुरु असलेल्या कामांची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केली.
यावेळी आमदार भारत भालके यांनीही बांधण्यात आलेल्या घाटाची पाहणी  करुन घाटांच्या कामांचा दर्जा,  पाय-यांची रुंदी व  गर्दी होणा-या ठिकाणांच्या घाटांची माहिती घेवून आवश्यक त्या सुचना दिल्या. तसेच 15  मिटर  बांधण्यात आलेल्या घाटाच्या बांधकामा विषयी समाधान त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी संबधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.










महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments