पंढरपूर LIVE 11 मे 2018
पंढरपूर, दि. 11 (प्रतिनिधी) - सोशल मीडियाचा खुबीने वापर आणि बेरकी नजर असलेल्या पोलीस हवालदार हणमंत देशमुख यांनी तीन खूनाच्या गुन्ह्यांमध्ये सतरा वर्षांपासून फरार असलेल्या भाऊसो वसंत पाटील (वय 38, रा. वाळवा जिल्हा सांगली) याला मोठ्या शिताफीने जेरबंद केले.
भाऊसो पाटील हा सांगली जिल्ह्यातील कुप्रसिद्ध गुन्हेगार आहे. याच्यावर संताजी खंडागळे यांच्या खुनासह अन्य दोन व्यक्तीच्या खूनाचे गुन्हे दाखल आहेत. विविध गुन्हे करून तो 2010 पासून फरार होता.
सांगली पोलिसांनी भाऊसो पाटील याचा फोटो आणि त्याच्या गुन्ह्याची माहिती व्हाट्सअप ग्रूपवर शेअर केली होती. हि पोस्ट फिरत फिरत पंढरपूरचे ए. एस. आय. हणमंत देशमुख यांच्या मोबाईलवर आली.
तेंव्हा आपल्या बेरक्या नजरेतून त्यांनी टिपून ठेवली आज सकाळी साडेनऊच्या सुमारास देशमुख पंढरपूर मधील अर्बन बँक चौकातील एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी भाऊसो पाटील या एटीएम जवळ उभा असलेला दिसून आला.
काही दिवसापूर्वी व्हाट्सअप ग्रूपवर पाहिलेला व्यक्ती हा असावा अशी शंका देशमुख यांना आली त्याची शहनिशा करण्यासाठी त्यांनी आपला मोबाईल काढून त्यामधील फोटो काढून पाहिला तर समोर उभी असलेली व्यक्ती फरारी आरोपी आहे याची खात्री पाटली.
पण गडबड व्हायला नको म्हणून नकळत फोटो काढून त्यांनी शहनिशा करण्यासाठी आपल्या सांगलीच्या मित्राला टाकला. मित्रांकडून शहनिशा होईपर्यंत भाऊ पाटलाला देशमुख यांच्या एकूण हालचालीमुळे संशय आला.
आणि पाटलाने धूम ठोकली पाटील पुढे आणि देशमुख मागे, पाटलाने नवरंगे बालकाश्रमातील भिंतीवरून उडी मारली आणि पसार झाला. पाठोपाठ देशमुख यांनी उडी घेतली आणि पाटीलला जेरबंद केले.
पाटील आणि देशमुख यांच्यातील लपाछपीचा डाव पाहून बघ्यांची गर्दी झाली. देशमुख यांनी लागलीच पंढरपूर शहर पोलिसांची गाडी बोलाविली. आणि सांगली पोलिसांना या अटकेची खबर दिली.
सांगली पोलिसांनी भाऊसो पाटलाला दुपारी दीड वाजता पंढरपूर पोलिसांच्या स्वाधीन केले. हवालदार देशमुख यांनी सोशल मीडियाचा वापर खुबीने आणि सतर्कपणे केल्यामुळे गेली सतरा वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या धाडसी कारवाई बद्दल ए. एस. आय. देशमुख यांचे पोलीस अधिकर्यांसह सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com







0 Comments