विनामुल्य सामुहिक विवाह सोहळ्याची संकल्पना मांडल्याबद्दल महाराष्ट्राचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांचा सन्मान

पंढरपूर LIVE 12 मे 2018

परळी-महाराष्ट्राचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी राज्यात सर्वधर्मिय विनामुल्य सामुहिक विवाह सोहळ्याची चळवळ सुरु केल्याने वधु-वरांच्या कुटुंबियांच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत झाली व विवाहाचा ताण वधु पित्यांना येणारा कमी झाला. त्याबद्दल आयुक्त शिवकुमार डिगे यांचा बीड जिल्हा धर्मादाय संस्था अंतर्गत सामुहिक विवाह समिती २०१८ च्या वतीने सन्मान पत्र  देऊन वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांच्या हस्ते गौरविण्यात आले 

परळी येथे दि.०८ मे रोजी आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेतुन दिमाखात ३८ सर्वधर्मिय विनामुल्य सामुहिक विवाह सोहळा लावण्यात आला. यामुळे ७६ कुटुंबातील वधु-वर पिता खुश झाले. कुटुंबांनिही या विवाह सोहळ्याचे तोंडभरुन कौतुक केले. तसेच बीड येथे १२ मे रोजी ६१ वधुवरांचे शुभमंगल होणार आहे. परळी येथे झालेल्या सामुहिक विवाह सोहळ्यात शिवकुमार डिगे यांचा सन्मान करण्यात आला.

 यावेळी मानपत्राचे वाचन प्रदिप खाडे यांनी केले. कार्यक्रमास सहाय्यक धर्मादाय आयुक्त काशीनाथ कामगौडा, धर्मादाय उपायुक्त के.आर.सुपाते, संजय पाईकराव,  बीड जिल्ह धर्मादाय संस्था अंतर्गत सामुहिक विवाह समिती २०१८ चे अध्यक्ष राजेश देशमुख, सचिव विजयराज बंब, उपाध्यक्ष बाबासाहेब मस्के, सहसचिव अंकुश काळदाते, कोषाध्यक्ष श्रीराम देशपांडे, ऍड.संतोष पवार, प्रा.संतुक देशमुख, प्रदिप खाडे, ऍड.जरीना देशमुख व इतर सदस्य उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हयात सामुहिक विवाह सोहळा होत आहे.बीड जिल्हयातील परळी येथे सामुहिक विवाह सोहळा चांगल्या पध्दतीने झाला.विविधतेत एकता या सर्व धर्मीय सामुहिक विवाह सोहळयास पाहावयास मिळत आहे.गरीबांना लग्नाची चिंता वाटू नये यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाने सर्वधर्मीय विनामुल्य सामुहिक विवाह सोहळा सुरू केला आहे.
-शिवकुमार डिगे
 धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई
  महाराष्ट्राचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेतुन महाराष्ट्रात सर्वधर्मिय विनामुल्य सामुहिक विवाहाची चळवळ सुरु झाली. यामुळे सामान्य शेतकरी, शेतमजुर, अदिवासी, अल्पसंख्याक समाजातील वधु वरांच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत झाली व होणारा खर्च टळल्या गेला. त्याबद्दल आयुक्त शिवकुमार डिगे यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. राज्यात या सामुहिक विवाह सोहळ्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे....
- राजेश देशमुख
सेक्रेटरी: वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट, परळी वैजनाथ










महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments