महाविद्यालयाच्या आवारातील उपहारगृहांनी अन्न सुरक्षा मानदे अधिनियमाची अंमलबजावणी करणे आवश्यक

पंढरपूर LIVE 17 मे 2018

मुंबई, दि. 17 : महाविद्यालयाच्या आवारातील उपहारगृहांनी अन्न सुरक्षा मानदे अधिनियमाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 अंतर्गत कलम 31 नुसार परवाने/नोंदणी घेणे आवश्यक आहे.
प्रत्येक अन्न व्यावसायिकांने अन्न पदार्थ उत्पादनसाठवणवितरणवाहतूक आणि विक्री यासाठी अन्न परवाना तथा नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यानुसार प्रत्येक अन्न व्यावसायिकांने अन्न सुरक्षा व मानदे कायद्याअंतर्गत परवाना नोंदणी घेणे आवश्यक आहे. महाविद्यालये/विद्यापीठ/शैक्षणिक संस्था यांच्या आवारातील उपहारगृहे यांनी परवाना अथवा नोंदणी घेतलेली नसेल त्यांनी परवाना व नोंदणी त्वरित घेणे आवश्यक आहे.
परवाना व नोंदणी foodlicensing.fasai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने करावयाची आहे. अन्न व्यावसायिकांनी वार्षिक उलाढालीप्रमाणे ऑनलाईन नोंदणीचा अर्ज भरावयाचा असून याबाबत काही अडचण असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या संबंधित कार्यालयास किंवा 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.









महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments