भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेतील तीन आरोपींचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला

पंढरपूर LIVE 11 मे 2018

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या तीन आरोपींना जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. अक्षय अल्हात, चेतन अल्हात आणि तुषार जंजाळ या तिघांचा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर या तिघांनी जामिनासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. तुषार जंजाळ या 19 वर्षीय तरुणाने पोलीस कस्टडीमुळे आपली दहावीची परीक्षा हुकल्याचं कोर्टाला सांगितलं. 

या याचिकेवर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली तेव्हा हे प्रकरण सुट्टीकालीन न्यायालयात ऐकलं जाऊ शकत नाही, असे निर्देश देत याचिकाकर्त्यांना जामीन देण्यास नकार दिला. भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी एकूण 14 जणांना अटक केली आहे. आपल्याविरोधात पोलिसांकडे कोणतेही पुरावे नाहीत. कुणीही जबानीत त्यांचं नाव घेतलेलं नाही. केवळ एका विशिष्ट समाजाचे असल्याने पोलीस आपल्याला यात गोवत असल्याचा हायकोर्टात आलेल्या या तीन आरोपींचा आरोप आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे यांना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.










महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments