पंढरपूर LIVE 1 Jun 2018
*आपेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने 29 नवदांम्पत्यांना वृक्षरोप भेट*
*_प्रामाणिक लोकांनाच चांगले दिवस येतील -शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख_*
-----------------------------
अंबाजोगाई (प्रतिनिधी) तालुक्यातील आपेगाव ग्रामपंचातीच्या वतीने 1 मे 2017 ते 12 मे 2018 या कालावधीत विवाह झालेल्या आपेगाव येथील नवदांम्पत्यांना धोंडे जेवण देण्यात आले.या प्रसंगी धोंडे जेवणासोबत मतदार यादीत नांव नोंदणी, आधार कार्ड दुरूस्ती करून विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र ही देण्यात आले.तसेच पर्यावरण जनजागृती व्हावी या उद्देशाने 29 नवदांम्पत्यांना वृक्षरोप भेट दिले.
मंगळवार दि.29 मे रोजी झालेल्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव उबाळे, तहसीलदार संतोष रूईकर,मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया,हातोला गावचे सरपंच अॅड.जयसिंग चव्हाण,पत्रकार गोविंद शेळके,श्री.मेनन,संजय काळे,आपेगावच्या सरपंच सौ.प्रियंकाताई निलेश शिंदे,उपसरपंच
महादेव भोरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या अभिनव उपक्रमाला शुभेच्छा देताना जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांनी पर्यावरण जनजागृतीला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगुन एकत्र समाजात कुटुंबपद्धती राहिली पाहिजे, नवदाम्पत्यांनी एकमेकांना समजून घेतले पाहिजे,आपल्या आई-वडीलांचा सांभाळ करा,तालुक्यात अॅड.जयसिंग चव्हाण व प्रियंकाताई निलेश शिंदे यांच्या सारखे सरपंच अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत असल्याचे सांगुन प्रामाणिक,सज्जन लोकांनाच यापुढे चांगले दिवस येतील त्यामुळे सतत कार्यमग्न रहा, चांगले काम करा,असे सांगुन त्यांनी आपेगाव ग्रामपंचायतीने सदरील उपक्रम राबविल्याबद्दल अभिनंदन केले.“एक झाड व एक मुल" हा नवा नारा राजेसाहेब देशमुख यांनी यावेळी दिला.प्रारंभी सामाजिक कार्यकर्ते निलेश शिंदे यांनी सदरील उपक्रमाबाबत माहिती देताना सांगितले की, 30 डिसेंबर 2017 रोजी सरपंच पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर पहिल्याच ग्रामसभेत ग्रामस्थांच्या अडीअडचणी व विविध प्रश्न सोडविण्यासाठी विचार विनिमय झाला. यावेळी झालेल्या चर्चेत प्रकर्षाने मतदार यादीत नांवनोंदणी,आधार कार्ड दुरूस्ती बाबत अनेकांनी आपले विचार मांडले. तसेच भूमिपुत्रांचा सन्मान,गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आदी उपक्रम राबविण्यात आले. त्यातून अधिक मास असल्याने धोंडे जेवण निमित्ताने नवदाम्पत्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देत आहोत. मतदार यादीत नाव नोंदणी करीत आहोत. आधार कार्डवरील माहितीत दुरूस्ती हे सर्व आज एकाच जागी उपलब्ध करून देण्यात आले.या सोबतच पर्यावरण जनजागृतीसाठी वृक्षरोप भेट देत आहोत पुढील काळातही आपेगाव ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल,वृक्ष लागवडीसाठी मानवलोकच्या वतीने करण्यात येत असलेल्या सहकार्याबद्दल आभार माणून 500 वृक्षरोपांची लागवड करणार असल्याचे निलेश शिंदे म्हणाले.या प्रसंगी तहसीलदार संतोष रूईकर यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करून नवदांम्पत्यांना शुभेच्छा दिल्या व निलेश शिंदे आणि आपेगाव ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले.प्रत्येक गावात असा उपक्रम राबविण्यात यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.यावेळी मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी या उपक्रमातून गावचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे हा उद्देश असून आपेगावची ओळख शाश्वत शेती व प्रयोगशील शेतकर्यांसाठी आहे. आपेगाव मधील गावकर्यांनी शेतात बांधबंधिस्तीसाठी पुढाकार घ्यावा.कारण, दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.अशावेळी पाण्याचे महत्व ओळखा एकत्र या,गाव संघटीत करा,जलयुक्त शिवार सारखी कामे करा असे आवाहन करून वृक्ष लागवडीसाठी मानवलोकच्या वतीने यंत्रसामुग्री पुरविली जाईल असे लोहिया म्हणाले.या प्रसंगी सरपंच जयसिंग चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.तर जिल्हा परिषद सदस्य शंकरराव उबाळे यांनी धोंडे जेवणासोबत सामाजिक उपक्रम राबवून आपेगावच्या सरपंच शिंदेताई यांनी चांगला पायंडा पाडल्याचे उबाळे म्हणाले. सुञसंचालन ब्रिजलाल जोशी यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून निलेश शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी आपेगाव ग्रामपंचायत सदस्य भास्कर शिंदे, सुवर्णमालाताई सरवदे, सचिन आचार्य, ग्रामसेवक रघुनाथ सरवदे,शिवाजीकाका शिंदे,आविनाश तट,
प्रगतशील शेतकरी बालासाहेब तट,रंगनाथ तट,द्रौपदीताई खुळे, मनिषाताई तट,आश्रूबा महाराज कुरूडे यांच्यासहीत नवदांम्पत्यांचे नातेवाईक,महिला, प्रतिष्ठीत नागरिक यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments