जलयुक्त शिवार योजनेला परळी तालुक्यात खिंडार! २४ कृषी अधिकाऱ्यांनंतर १३८ मजूर संस्थावर गुन्हे दाखल वसंत मुंडे यांच्या प्रयत्नाला यश..!

पंढरपूर LIVE 29 Jun 2018

वसंत मुंडे यांच्या प्रयत्नाला यश..! 

परळी वैजनाथ  : जलयुक्त सारख्या उपयुक्त योजनेला खिंडार अधिकाऱ्यांसह आता मजूर संस्थाचा कारभारही चव्हाट्यावर आला आहे. यासंबंधी तब्बल १३८ मजुरसंस्थावर परळी शहर ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. नव्याने तालुका कृषी अधिकारी म्हणून रुजू झालेले सोनवणे यांच्या फिर्यादीवरून प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 

जलयुक्त शिवारा संदर्भात महाराष्ट्र शासनाकडे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी ओ.बी.सी.विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी तक्रारी भ्रष्टाचारा विरोधात दाखल केल्या होत्या.  जलयुक्त मधील गैरप्रकाराबद्दल आणखीन तक्रारी दाखल केल्याचे त्यांनी सांगितले आहे.


गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात सर्वाधिक ३५ कोटीचा निधी एकट्या परळी तालुक्यासाठी खर्ची करण्यात आला होता. मात्र, नेत्यांच्या कार्यकर्त्यांचा गोतवाळा आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांची मिळालेली साथ यामुळे जलयुक्त सारख्या योजनेतून पाणी न मुरताच अधिकारी-कर्मचारी आणि संबंधित संस्थांनी प्रशासनाची फसवणूक करून कोट्यावधी निधीवर डल्ला मारल्याचे कृषी आयुक्तांनी नेमलेल्या चोकशी समितीच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार ७ सदस्यीय समितीने प्रत्यक्ष कामाची पाहणी करून तीन महिन्यापुर्वी २४ कृषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. येथील तालुका कृषी कार्यालयाला कायमस्वरूपी अधिकारी लाभत नसल्याने मजुरसंस्थावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रखडली होती. मात्र २५ जून रोजी तालुका कृषी अधिकारी म्हणून रूजू झालेले अशोक सोनवणे यांनी फिर्याद नोंद केली असून १३९ मजूर संस्थावर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.
सर्वात मोठी कारवाई 
जलयुक्त शिवार अभियनातून जलसंधारणाची मोठी कामे झाली असून त्याचे परिणामही दिसू लागले आहेत. मात्र, पालकमंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याच तालुक्यात कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांनी या योजनेला खिंडार पाडले आहे. एप्रिल महिन्यात कृषी सहाय्यकापासून उपविभागीय कृषी अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. उर्वरीत प्रक्रिया ही गुरूवारी पार पडली असून सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले आहे.
कृषी आयुक्त कार्यालयाचा दबाव
कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली खरी मात्र संबंधित संस्था मोकाटच असल्याने कारवाई संदर्भात सातत्याने विचारणा केली जात होती. मात्र, येथील तालुका कृषी कार्यालयाचा पदभार घेण्यास धजावत नव्हते. मात्र महिन्याभरापूर्वी अशोक सोनवणे यांनी पदभार घेतला आयुक्त कार्यालयाच्या आदेशाने त्यांनी ही कारवाई केली आहे.
वसंत मुंढे यांच्या प्रयत्नाला यश
जलयुक्त शिवारा संदर्भात महाराष्ट्र शासनाकडे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी ओ.बी.सी.विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी १८ ऑगस्ट २०१६ रोजी महाराष्ट्र शासनाकडे व ३० ऑगस्ट २०१६ ला वेगवेगळ्या दोन तक्रारी भ्रष्टाचारा विरोधात दाखल केल्या होत्या. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची आजची शेवटची मुदत असतानाच ही कारवाई करण्यात आली आहे. जलयुक्त मधील गैरप्रकाराबद्दल आणखीन तक्रारी दाखल केल्याचे त्यांनी सांगितले आहे.
.तरीही अधिकारी निग्गरगट्टच
२४ कृषी अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर परळी तालुक्यातील एकाही कमला किंवा बिलाला मंजुरी देऊ नये असे आदेश असतानाही नोव्हेंबर- डिसेंबर २०१७ च्या दरम्यान कोट्यवधी बिलांना मंजुरी देण्याचा घाट जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे इकडे चौकशी सुरु असताना निग्गरगट्ट अधिकाऱ्यांनी दुसरीकडे कोट्यवधींचा अपहार केला असून यासंबंधी वसंत मुंडे यांनी कृषी आयुक्त तसेच मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या २४ अधिकाऱ्यानंतर आता कुणावर कारवाई होणार यासंबधी तर्क- वितर्क लावले जात आहेत. 












महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments