नात्याला काळीमा... सख्खा भाऊच बनला यमदुत... भावाने घर पेटवून दिल्याने चार जणांचा मृत्यू

नात्याला काळीमा... सख्खा भाऊच बनला यमदुत... 

भावाने घर पेटवून दिल्याने चार जणांचा मृत्यू 

पंढरपूर LIVE 29 Jun 2018


 बार्शी तालुक्यातील खांडवी गावात भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीय. सख्खा भाऊच यमदुत बनून भावासह कुटुंबातील चार जणांच्या मृत्युस कारणीभूत ठरलाय.  घर जागेच्या वादातून भावानंच भावाचे घर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. बार्शी तालुक्यातील खांडवी येथील हा प्रकार आहे. दरम्याव, मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका पोलीस शिपायाचा समावेश आहे. 
सुषमा देवकते, आर्यन देवकते, राहुल देवकते व कुटुंबातील एका महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे. घर जागेच्या वादावरुन भाऊ रामचंद्र देवकते याने गुरुवारी (28 जून) रात्री भावाच्या घरातील लोक झोपेत असताना त्यांच्या अंगावर रॉकेल ओतलं व त्यांना पेटवलं.
या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता तर अन्य दोघांचा उपचारादरम्यान अंत झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर बार्शी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यातील आरोपी रामचंद्र हा देखील जखमी झाला आहे.












महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments