पंढरपूर LIVE 29 Jun 2018
पंढरपूरचे माजी नगरसेवक नंदकुमार डोंबे यांच्यासह अन्य दोन जणांना नंदूरबार जिल्ह्यात मुलं चोरणारे चोरटे समजून बेदम मारहाण करण्यात आली आहे. पोलीस वेळीच या तिघांच्या मदतीला धावून आल्याने पुढील अनर्थ टळला आहे. पोलिसांनी या तिघांचा जीव वाचवेपर्यंत मारहाण करणाऱ्यांनी डोंबेंची इनोव्हा फोडून टाकली आणि नंतर ती पेटवून दिली.
ही घटना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात म्हसावद इथे घडलीय. माजी नगरसेवक डोंबे आणि त्यांचे साथीदार मजुराचा शोध घेण्यासाठी फिरत होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने गावकऱ्यांनी त्यांचा पाठलाग करायला सुरूवात केली. ही बातमी गावभर पसरताच जवळपास तीन हजार ग्रामस्थ जमा झाले. या सगळ्यांनी डोंबे आणि त्यांच्या साथीदारांना घेरत त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत नंदकुमार बाळोबा डोंबे, रामा विठ्ठल शिंदे (भटूबरे), सचिन गुरुलिंग कवडे (पटवर्धन कुरोली) हे तिघे गंभीर जखमी झालेत.
पोलिसांनी या तिघांना जमावाच्या तावडीतून सोडवल्यानंतर पोलीस ठाण्यात नेले तिथेही हा जमाव पोहोचला होता, या जमावाने तिघांना आपल्या ताब्यात द्या असं म्हणत गोंधळ घालायला सुरूवात केली. परिस्थिती इतकी चिघळली की पोलिसांना अधिकची कुमक मागवायला लागली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या जमावापासून डोंबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कसंबसं वाचवत पोलिसांनी नंदूरबारच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. या सगळ्या प्रकारात दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. डोंबे आणि त्यांच्या साथीदारांचीस प्रकृती सध्या उत्तम असल्याचं सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकूण २०० जणांच्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणणे असे गुन्हे दाखल केले आहेत.
विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मुलं पळविणारी टोळी फिरत असल्याची अफवा जोरात फिरते आहे. या अफवेमुळे निष्पापांना मारहाण झाल्याच्या काही घटना संभाजीनगर शहरात घडल्या आहेत. या अफवेचं लोण आता राज्याच्या इतर भागातही पसरायला लागलंय. या अफवांमुळे गावातील जनता तिऱ्हाईतांकडे संशयाने पाहायला लागली आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments