गोपाळपूरच्या श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयात आजपासून प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीचे ऑनलाईन प्रवेशाची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु

पंढरपूर LIVE 7 Jun 2018


पंढरपूरः-शैक्षणिक वर्ष २०१८-१९  करीता प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या (पदवी) प्रवेशासाठी गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयात फॅसिलिटेशन सेंटर (क्र.६२२०) केंद्राला मा.संचालकतंत्र शिक्षण संचालनालयमुंबई यांनी प्रतिवर्षीप्रमाणे यंदा देखील मान्यता दिली असून आज गुरुवार, दि.७ जून २०१८ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू होत असून ही प्रक्रिया दि १९ जून २०१८ (मंगळवार) पर्यंत चालणार आहे. या कालावधीत अर्ज कायम करणेकागदपत्राची पडताळणी करणे व सदर ऑनलाईन अर्ज कायम करणे याची सुविधा श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयात उपलब्ध आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली. 





          येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी (पदवी) महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकीसाठी आज गुरुवार ७ जून२०१८ पासून ऑनलाईन प्रवेशअर्ज भरण्याची, कागदपत्रे पडताळणी व छाननी आदी प्रक्रिया सुरू होत आहे. सदर प्रक्रियेसाठी सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली उच्च शिक्षित प्राध्यापकवर्ग, आधुनिक संगणक१०२४ एम.बी.पी. एस.लीज लाईन क्षमता असलेली इंटरनेट सुविधा, वातानुकुलीत हॉलसह संबंधित सर्व बाबी सज्ज आहेत.अभियांत्रिकीचे ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरण्याकरीता पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी सोलापूरसांगलीपुणे अशा ठिकाणी जात होते. हे पाहून तंत्रशिक्षण संचालकांनी या महाविद्यालयाचा शैक्षणिक क्षेत्रातील चौफेर प्रगती पाहून फॅसिलिटेशन सेंटर क्र.-६२२० केंद्र म्हणून गेल्या १३ वर्षापासून सतत मान्यता दिलेली आहे. ही प्रक्रिया दि.१९ जून २०१८ (मंगळवार) पर्यंत चालणार आहे. प्रवेश प्रक्रियेत गेल्या दोन वर्षापासून बदल केले असून यामध्ये फ्रीज, फ्लोट व स्लाईड या नव्या कॅपराऊंडमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवेश प्रक्रियेचे नियम बदलल्यामुळे विद्यार्थ्याबरोबर पालक ही चिंतेत असतात. त्यांची शंका दूर करण्यासाठी स्वतंत्र माहिती विभाग देखील स्थापन केले असून यामध्ये अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे. या ऑनलाईन प्रवेश नोंदणी नंतर भरलेल्या फॉर्म मधील झालेल्या चुकांच्या दुरुस्तीसाठी कालावधी देणार आहेत. त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रवेशाच्या मुख्य कॅप राउंडस सुरु होतील. पदवी अभियांत्रिकीच्या संबंधी अधिक माहितीसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या http://www.dtemaharashtra.gov.in या वेबसाइटवर तसेच पदवी अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. पी.एस.कचरे (९५४५५५३७७४), प्रा. आर. बी. कागदे (९९७५३८२२२३) व टोल फ्री क्रमांक १८०० ३००० ४१३१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. स्वेरीमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाच्या सोयीमुळे विद्यार्थ्यांना आता खात्रीशीर माहिती मिळणार आहे. त्यामुळे वेळ वाचणार आहे.यामुळे एकूणच ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाबरोबरच आनंदाचे वातावरण पसरले आहे. विद्यापीठात सर्वोत्कृष्ट निकाल, कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या महत्वाच्या बाबींमुळे यावर्षीही विद्यार्थी व पालकामध्ये श्री विठ्ठल अभियांत्रिकीचाच बोलबाला आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments