पंढरपूर LIVE 1 Jun 2018
भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या प्रदेशउपाध्यक्षपदी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) राम सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सातपुते यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व खासदार रावसाहेब दानवे, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष,आमदार योगेश टिळेकर व योगेश्वर राजपुरोहित उपस्थित होते.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सातपुते यांनी विविध पदावर कार्य केले आहे. अभाविपच्या तंत्र शिक्षण विद्यार्थी परिषदेचे महाविद्यालय प्रमुख, प्रदेश सहमंत्री आणि प्रदेशमंत्री अशा विविध पदावर त्यांनी उत्कृष्ठपणे कार्य केले. विद्यार्थ्यांच्या अन्यायाला वाचा फोडली. त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम सातपुते यांनी केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्याकडे आता भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments