हुतात्मा स्मृती मंदिरच्या ऑनलाईन बुकींगमध्ये सुधारणा करावी

पंढरपूर LIVE 28 Jun 2018


नाट्य व्यवस्थापन संघाकडून मनपा आयुक्तांना निवेदन
सोलापूर, (प्रतिनिधी):- सोलापूरच्या नाट्यचळवळीचे केंद्र बिंदु असलेल्या हुतात्मा स्मृती मंदिरचे बुकींग सोलापूर महानगर पालिकेने ऑनलाईन पध्दतीने सुरू केले आहे परंतु त्या वेबसाईटमध्ये काही सुधारणार करण्यात याव्यात यासाठी नाट्यव्यवस्थापन संघ तसेच नाट्यप्रेमींकडून सोलापूर महानगर पालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांना नाट्यव्यवस्थापन संघ तसेच नाट्यप्रेमींकडून निवेदन देण्यात आले. 
     सोलापूर महानगर पालिकेच्या मालकीचे हुतात्मा स्मृती मंदिर योग्य पध्दतीने चालावे तसेच या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाना योग्यपध्दतीने नाट्यगृह उपलब्ध व्हावे यासाठी ऑनलाईन पध्दतीने बुकींगची व्यवस्था सुरू करण्यात आली. या ऑनलाईन बुकींगपध्दतीचे नाट्यरसिक तसेच नाट्यव्यवस्थापन संघाने स्वागत केले परंतु या ऑनलाईन बुकींग प्रक्रियेत काही त्रुटी आहेत. त्यामध्ये बुकींग करताना डिपॉझिट घेतली जाते त्या एकाच डिपॉझिटवर इतर तारखा आणि स्लॉट देण्यात यावे, बुकींग ऑनलाईन होते तसेच बुकींग ऑनलाईन रद्द करण्याची सुविधा द्यावी,सर्व नाट्य व्यवस्थापकांना संबधित विषयाचे डिपॉझिट कोड नं. देण्यात यावा, प्रयोग संपल्यानंतर ज्यांना डिपॉझिट आवश्यक आहे त्यांना त्वरीत देण्याची व्यवस्था व्हावी, स्थानिक कलावंताच्या सादरीकरणाला पुर्वी 20 टक्के सवलत देण्यात येत होती ती 40 टक्के वाढ करून द्यावी या अशा अन्य मागण्या यावेळी या निवेदनामध्ये करण्यात आल्या. 
  महानगर पालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी ऑनलाईन बुकींग केल्याने हुतात्मा स्मृती मंदिरच्या कारभारात सुसूत्रता आली आहे. तसेच निवेदन स्विकारल्यानंतर यामध्ये सकारात्मक विचार करून योग्य ते बदल वेबसाईटमध्ये करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. सोलापूर नाट्यव्यवस्थापन संघ आणि महानगर पालिका आयुक्त यांच्यामध्ये समन्वय राहावा यासाठी नगरसेवक गुरूशांत धुत्तरगांवकर यांनी विशेष प्रयत्न केले तसेच निवेदन देण्यासाठी नाट्यव्यवस्थापन संघाचे अध्यक्ष शिवानंद चलवादी, अखिल भारतीय नाट्यपरिषद उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंके, नगरसेवक गुरूशांत धुत्तरगांवकर, नगरसेवक विजय हंचाटे, विठ्ठल कोटा, प्रशांत बडवे, गुरू वठारे, गफूर बागवान, सिकंदर शेख यांच्यासह नाट्यरसिक उपस्थित होते.












महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments