हरीनामाच्या गजरात संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

पंढरपूर LIVE 28 Jun 2018

   
नाशिक - आषाढी एकादशिनिमित्त महाराष्ट्रभरातून पालख्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होण्यास सुरूवात झाली आहे. आज नाशिकच्या त्र्यंबकेश्‍वर नगरीतून हरीनामाचा गजर करत संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपुरच्या दिशेने रवाना झाली. जवळपास १० हजारांच्या आसपास वारकरी यामध्ये सहभागी झाले आहेत.

वाटेत या पालखी सोहळ्यात अनेक वारकरी जोडले जातात. पंढरपूरपर्यंत १ लाखाहून अधिक वारकरी या पालखीसोबत पंढरपूरला पोहोचतात. या वारकऱ्यांमधे वृध्द आणि महिलांची संख्या लक्षणीय आहे. २६ दिवसांच्या प्रवासानंतर ही पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे.

या पालखीत संत निवृत्तीनाथ महाराजांचा चांदीचा रथ आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे बंधू आणि गुरू म्हणून निवृत्तीनाथ महाराज यांची ओळख आहे. त्यामुळे या पालखीला विशेष महत्व आहे. राज्यभरातून हजारो वारकरी आज त्र्यंबकेश्वर नगरित दाखल झाले होते. रामकृष्ण हरी या महामंत्राने संपूर्ण त्र्यंबकनगरी दुमदुमून गेली. 

सर्व वारकरी बंधुंना विनंती.. आषाढी यात्रेसंदर्भातील फोटो, व्हिडीओ, बातमी योग्य घटना पंढरपूर लाईव्ह वर प्रसिध्दीसाठी आम्हाला मेल करा किंवा व्हाटस अप करा! आपण दिलेल्या बातमी योग्य घटनेची व फोटोंची आपल्या नावाच्या उल्लेखासह ठळपपणे प्रसिध्दी केली जाईल.  
व्हाटस अप 8308838111   
MAIL- livepandharpur@gmail.com












महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments