पंढरपूर LIVE 4 Jun 2018
महाराष्ट्र राज्य अॅथेलटिक्स संघटनेच्या वतीने मिनाताई ठाकरे विभागीय क्रिडा संकुल, नाशिक येथे सुरु असलेल्या खुल्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत पंढरपूर येथील आजिंक्य स्पोर्ट अॅकडमी पंतनगर ची कु.संतोषी देशमुख हिने थाळीफेक या खेळ प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. तिची गुवाहाटी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल सोलापूर जिल्हाचे आमदार प्रशांत परिचारक व आजिंक्य स्पोर्ट अॅकडमी चे मार्गदर्शक युटोपियनचे चेअरमन उमेश परिचारक यांनी अभिनंदन केले.
ती सध्या आजिंक्य स्पोर्ट अॅकडमी, पंतनगर, पंढरपूर येथे मार्गदर्शक प्रा.सुभाष मस्के सर प्रशिक्षक
चेतन धनवडे सरांचे मार्गदर्शन खाली सराव करत आहे. यावेळी पंढरपूर बँकेचे संचालक सतीश मुळे, बाजार समितीचे सभापती दिलीपअप्पा घाडगे, जिल्हा परिषद सदस्य तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमार आदि मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments