पंढरपूर LIVE 4 Jun 2018
आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केले ‘डाळिंबावरील प्रक्रिया’ या विषयावर शोधनिबंध
पंढरपूर- स्वेरी संचलित बी. फार्मसी मधील प्रा. वृणाल मोरे, प्रा. प्राजक्ता खुळे आणि प्रा. सचिन जाधव यांनी नुकत्याच सिंगापूरमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत संशोधन प्रबंध सादर केला. सातासमुद्रापार जाण्याची ही संशोधक प्रा. मोरे, प्रा. खुळे व प्रा. जाधव यांची पहिलीच वेळ असून त्यांनी त्या ठिकाणी ‘ डाळिंबावरील प्रक्रिया’ या विषयावर शोध निबंध सादर केला. याप्रबंधामुळे तेथील परदेशी संशोधकांनी स्तुती करून पाठ थोपटली.
‘अॅन्युअल फार्मासुटीकल बायोटेक्नॉलॉजी कॉंग्रेस’ही आंतरराष्ट्रीय परिषद सिंगापूर मधील ‘हॉलिडे इन’ येथे पार पडली. यामध्ये ‘औषधनिर्माण शास्त्र आणि जैवतंत्रज्ञान’ या विषयावर आयोजिलेल्या दोन दिवसीय परिषदेत सिंगापूरसह अमेरिका, नेदरलँड, इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया, भारत यांच्यासह इतर देशातील संशोधक शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला होता. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (NUS) यांनी याचे आयोजन केले होते. यामध्ये येथील बी. फार्मसीमधील प्रा. वृणाल मोरे, प्रा. प्राजक्ता खुळे आणि प्रा. सचिन जाधव यांनी ‘इम्मोबेलायझेशन ऑफ सॅक्रोमायसीस सर्वेसी इन जिलेनगम’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. जगभरातील संशोधक शास्त्रज्ञांनी सादर केलेल्या शोध निबंधात स्वेरीच्या प्राध्यापकांनी सादर केलेला शोधनिबंध उत्कृष्ठ ठरला. या शोध निबंधात त्यांनी ‘कमी भाव व भाव न मिळाल्यामुळे डाळिंबाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी संशोधनाद्वारे वेगवेगळ्या प्रक्रीया करून व्यवसायिक दृष्टया महत्वपूर्ण उत्पादने निर्माण करता येवू शकतात व डाळिंब उत्पादकांचे होणारे नुकसान टाळता येवू शकते. यासाठी तिघा प्राध्यापकांनी यावर शोधनिबंध सादर केला. या प्रक्रीयेचे पेटेंट देखील त्यांनी फाईल केले आहे. बी. फार्मसीच्या तिघा संशोधकांना संशोधन विभागाचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार यांचे मार्गदर्शन तर प्रा. धनराज शिंदे यांचे सहकार्य लाभले. या शोध निबंधामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा,संस्थेचे इतर विश्वस्त, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, इतर प्राध्यापकवर्ग विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments