आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन द्या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांची सूचना

पंढरपूर LIVE 3 Jun 2018




             पंढरपूर, दि.3 :- आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन  देऊन, असे विवाह करणा-या जोडप्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्या, अशा सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे केल्या.
पंढरपूर येथे शासकीय विश्रामगृह येथे आज श्री आठवले  यांनी आढावा बैठक घेतली त्यांनी बैठकीत या सूचना दिल्या. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, सहायक पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त अमित घवले उपस्थित होते.
 श्री.आठवले यांनी यावेळी सामाजिक न्यायविभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांचा आढावा घेतला. सामाजिक न्यायविभागाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करा, त्यासाठी  लोकांपर्यंत जा, असेही त्यांनी सागितले.
श्री. आठवले यांनी माहात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ, अपंग विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, संत रोहिदास विकास महामंडळाच्या वतीने  चालवल्या जाणा-या योजनांचा आढावा घेतला. यावेळी अपंग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक भिमराव मुगदल, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक लक्ष्मण क्षिरसागर, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाचे  एस.एस.कांबळे, संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळाचे अविनाश चाबूकस्वार आदी उपस्थित होते.




महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments