मुस्लिम ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवणार – मंत्री प्रा. राम शिंदे # ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्ग.ला आश्वासन

पंढरपूर LIVE 28 Jun 2018

   

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – मुस्लिम ओबीसी समाजाच्या प्रश्नांसंदर्भात लवकरच बैठक घेऊन सकारात्मक मार्ग काढण्यात येईल, असे प्रतिपादन राजशिष्टाचार, वि.जा., भ.ज., इ.मा.व. आणि वि.मा.प्र. कल्याण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी मंत्रालय येथे केले. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्यावतीने शिष्टमंडळाने मुस्लिम ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अंसारी यांनी पदाधिकाऱ्यांना आदेश दिल्यानंतर शिंदे यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुस्लिम समाजाचे प्रलंबित प्रश्न व विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. या निवेदनात ज्या नवीन जाती 1995 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्याकडून 1967 चा जातीचा पुरावा घेण्याची अट रद्द करण्यात यावी. भटक्या विमुक्त जाती जमाती व इतर मागासवर्गीय मुस्लिम प्रवर्गातील उमेदवारांना सहजरित्या जातीचे प्रमाणपत्र मिळणे संदर्भात जे शासकीय परिपत्रक आणि त्या परिपत्रकाच्या मजकुराची नोंद शासन निर्णयात आलेली आहे. त्या सर्व परिपत्रक व शासन निर्णयांना एकत्रित करून त्यावर आधरीत एक नवीन शासकीय आदेश निर्गमित करण्याचे आदेश व्हावेत. तसेच परिपत्रक स्पष्ट असून त्यात संबंधीत अधिकाऱ्यांना खात्री पटल्यास असे शब्द न टाकल्यास अधिकाऱ्यांना त्यांचा दुरुपयोग करता येणार नाही. भटक्या विमुक्त जाती जमाती व इतर मागासवर्गीय मुस्लिम समाजाची एक नवीन यादी तयार करून पूर्वीच्या यादीमधील ज्या जातींचा पुढे ' मुस्लिम ' असे नमूद करण्यात आले आहे ते वगळण्यात यावे. शासन परिपत्रक दि. 21/06/2001 प्रमाणे उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे जातीचा दावा सिद्ध होत असेल तर उमेदवारांकडून अधिकची कागदपत्रांबाबत आग्रह न धरण्याचे आदेश देण्यात यावेत तसेच उमेदवारांना व्यवसायाचा पुरावा दिल्यावर महसूल पुराव्याची अट रद्द करण्यात यावी, मुल्ला मुलाणी समाजाच्या जातीचे दाखले काढण्यासंदर्भातील होणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा झाली. गेल्या अनेक सरकार मध्ये मागासवर्गीय आयोगामध्ये मुस्लिम समाजाचा प्रतिनिधी म्हणून एक व्यक्ती घेण्यात येत होत या सरकार मध्ये अजून घेण्यात आले नाही तरी एक मुस्लिम प्रतिनिधी घेण्यात यावा आदी विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली. या मागण्यांवर व मुस्लिम समाजाच्या अडी - अडचणींसाठी सर्व संबंधित सह तथा उप सचिव, सचिव सामाजिक न्याय, आयुक्त समाज कल्याण, महासंचालक बार्टी पुणे, राज्य मागासवर्गीय आदी संबंधित अधिकारी, विभागीय जात पडताळणी समिती, जिल्हाधिकारी, तहसिलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेऊन त्यावर मार्ग काढण्यात येईल, तसेच राज्य सरकार मुस्लिम समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कठीबद्ध असून सकारात्मक आहे, असेही प्रा. शिंदे यांनी सांगितले. यावेळी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राज्याचे सचिव तथा मुल्ला मुलाणी समाजाचे अध्यक्ष शाहरुख मुलाणी, मुंबई संपर्क प्रमुख तथा सोलापूरचे अध्यक्ष इसाक खडके आदी उपस्थित होते.












महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments