आषाढी वारीतील समन्वयासाठी विशेष अधिकारी नियुक्त करणार विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांची माहिती

पंढरपूर LIVE 1 Jun 2018

पंढरपूर दि.31 :- पंढरपूरच्या आषाढी वारीच्या कालावधीत तीनही जिल्ह्यातील विविध विभागात समन्वय रहावा यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्त केला जाणार आहे.अशी माहिती प्रभारी विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर यांनी आज पंढरपूर येथे दिली.
प्रभारी विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी आज पंढरपूरातील विविध विकास कामे, श्री विठ्ठल मंदीर, परिसर, चंद्रभागा नदी पात्र, पत्राशेड विष्णूपद, गोपाळपूर,भक्तनिवास, दर्शन रांग, दर्शन मंडपास भेटी देवून पाहणी केली. यानंतर त्यांनी  शासकीय विश्रामगृह येथे रस्ते विकासाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिका-यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
            डॉ.म्हैसेकर म्हणाले, पुणे, सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यातून जाणा-या पालखी सोहळ्यासाठी राज्य शासन आणि जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत विविध  सेवा पुरवल्या. मात्र यामध्ये आणखी चांगला समन्वय साधला गेला तर आणखी प्रभावीपणे सेवा सुविधा पुरवता येतील. यासाठी पालखी कालावधीत अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी समन्वयक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंढरपूर शहर आणि मंदीर विकासाच्या आराखडयात आवश्यकता असल्यास बदल केले जातील. मात्र हे बदल भाविक, वारकरी आणि पंढरपूरचे रहिवाशी यांच्या गरजा विचारात घेवून केले जातील, असे डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.
यंदाच्या आषाढी वारीत वारकरी आणि भाविक यांना जास्तीत-जास्त सुविधा देता याव्यात, स्वच्छता ठेवली जावी, महिलांना कपडे बदलण्यासाठी नदीपात्रात पुरेशा सुविधा उपलब्ध करुन देणे, वाहतुकीचा ताण योणार नाही, अशा रीतीने नियोजन करण्यास प्राधान्य दिले जात आहे, असे डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.
आषाढी वारीसाठी उजनी धरणातून नदीत पाणी सोडले जाते. हे पाणी लवकर सोडता येते का याची तपासणी करुन करुन. यासाठी  सोलापूर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले आवश्यक कार्यवाही करतील असे डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले
यावेळी  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले , अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, सहाय्यक पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे,   उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, मारुती बोरकर, तहसिलदार मधुसूदन बर्गे आदी अधिकारी उपस्थित होते.
            तद्नंतर विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी  65 एकर आणि वाखरी, भंडीशेगांव, पिराची कुरोली येथील पालखी तळांना भेट देवून पाहणी केली.





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments