पंढरपुरातील विकास कामे 30 जून पर्यंत पुर्ण करा विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या सूचना

पंढरपूर LIVE 1 Jun 2018


पंढरपूर दि.31 :- आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना विठ्ठल दर्शनाने जितके समाधान मिळते, तितकेच समाधान पंढरपूर व परिसरातील विकास कामे पाहून व्हावी. यासाठी पालखी तळ, पालखी मुक्काम आणि पंढरपुरातील विकास कामे 30 जून 2018 पर्यंत पुर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी काल  दिल्या.
            येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आषाढी वारी आणि तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकास कामांचा आढाव विभागीय आयुक्त  डॉ. म्हैसेकर यांनी काल घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड,अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे,, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, सहायक पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पोपटराव बनसोडे, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराज दराडे, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्यासह संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनामार्फत विविध विकास कामे केली जात आहेत.  ही कामे जिल्ह्यातील विविध यंत्रणांमार्फत करण्यात येत असून आषाढी वारीत येणाऱ्या भाविकांना कोणतीही समस्या उद्भवणार  नाही यासाठी यंत्रणांनी त्यांच्याकडील कामांचा सुक्ष्म आराखडा तयार करुन त्यानुसार काम करावीत. यंदाची आषाढी वारी 23 जुलै 2018 रोजी होणार असून वारीपूर्वी जी कामे पुर्ण होणार आहेत ती कामे 30 जून  पूर्वी प्राधान्याने पूर्ण करावीत. कोणते काम किती वेळत पूर्ण केले जाणार याचा कृती आराखडा करा.
            विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर म्हणाले, पालखी तळावरील मुरमीकरणाचे काम दर्जेदार व्हावे. केलेल्या  मुरमीकरणामुळे वारकऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. अंतर्गत्‍ रस्ते, शौचालये, पिण्याचे पाणी या कामांना प्राधान्य्‍ द्यावे. छोट्या-छोट्या कारणांसाठी कामात विलंब झाल्यास संबंधित यंत्रणेस जबाबदार धरण्यात येईल. निधी उपलब्ध असताना विकास कामे खोळंबू नयेत असे त्यांनी सांगितले.
            पालखी मार्गावर वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी या मार्गावरील लहान झुडपे काढावीत. पालखतळ व पंढरपूरात व वारकरी राहत असणाऱ्या ठिकाणी विजेच्या तारा लोंबकळत असल्यास विद्युत वितरण कंपनीने त्या काढण्याची खबरदारी घ्यावी अशा सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments