महोत्सवात को-डी आणि फिलिंग लघुपट अव्वल..! प्रतिभा क्रिएशन्सचा लघुपट महोत्सव संपन्न

पंढरपूर LIVE 4 Jun 2018

लघुपट महोत्सवाचे उदघाटन करताना आ. प्रशांत परिचारक व आदि मान्यवर 

 पंढरपूर --
 येथील प्रतिभा क्रिएशन्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लघुपट महोत्सवामधे को-डी आणि फिलिंग या लघुपटांनी बाजी मारली. तर उदासीन लय या लघुपटांला सर्वोत्कृष्ट संगीताचे पारितोषिक मिळाले. आ. प्रशांत परिचारक यांच्या हस्ते या महोत्सवाचे  रविवारी उदघाटन झाले. 
 
           या महोत्सवाचे उदघाटन नटराजाचे आणि कॅमेऱ्याचे पूजन करून झाले. यावेळी आ. प्रशांत परिचारक , पांडुरंग घंटी , हरिष ताठे, उदय उत्पात , शांताराम कुकलर्णी , माधुरी जोशी , दिपक इरकल , अर्बन बँकेचे सरव्यवस्थापक भालचंद्र जोशी , नगरसेवक विवेक परदेशी महोत्सवाचे परिक्षक नंदकुमार कुलकर्णी , अतुल अंमळनेरकर , विनोद शेंडगे उपस्थित होते.
   पंढरपूर अर्बन बँकेच्या कर्मयोगी सभागृहांमधे झालेल्या लघुपट महोत्सवामधे प्रतिभा क्रिएशन्सच्या वतीने दर्जेदार असे दहा लघुपट दाखविण्यात आले. यातून परिक्षकांच्या निर्णयानुसार वरद जोशी दिग्दर्शित को-डी आणि सागर जाधव दिग्दर्शित फिलिंग  हया भ्रष्टाचार आणि माणुसकींच्या विषयांशी निगडीत असलेल्या लघुपटांनी महोत्सवावर पारितोषिकांची मोहोर उमटवली. तर या महोत्सवामधे अनाहत स्टुडींओचे विनोद शेंडगे यांच्या वतीने सर्वात्कृष्ट लघुपटाच्या पार्श्वसंगीताला पारितोषिक देण्यात आले. यामधे श्रीराम बडवे यांच्या उदासीन लय या लघुपटांने बाजी मारली. 

    या तीन पारितोषिक विजेत्या लघुपटांशिवाय पाणी सापडलं , मौन , शिक्षण , पत्रास कारण की.. , मि. अँड मिसेंस शर्मा , होळी असे दर्जेदार लघपुटांचे सादरीकरण झाले. तर महोत्सवाचा समोरोप आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवातील पारितोषिक प्रप्त जन्मजात या लघुपटांने झाला. टेंभुर्णी येथील किशोर लोंढे या उमद्या तरूणाच्या कलाकृतीतून जन्मजात ही एक अनोखी आणि पोतराज या दुर्लखित समाजघटकांशी आधारित ही कलाकृती होती. याला देखिल प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. 

सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिभा क्रिएशन्सचे अध्यक्ष ज्ञानेश बोंबलेकर , उपाध्यक्ष कन्हैय्या उत्पात , खजिनदार धनंजय मनमाडकर , कार्याध्यक्षा विनया उत्पात , सचिव विशाल तपकिरे यांच्यासह संदिप पिटके , वासुदेव पुजारी , अमित उत्पात , पदमनाभ देवडीकर , स्वप्निल जोशी , गणेश हरिदास , सचिन कुलकर्णी अनवलीकर , पल्लवी दशरथ , संकेत कुलकर्णी आदिंनी परिश्रम घेतले आहेत.





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments