माळशिरस तालुक्यातील ऋतुजा संपतराव भोसले हिची आशियाई टेनिस स्पर्धेसाठी निवड
पंढरपूर LIVE 2 Jun 2018
लवंग ( ता. माळशिरस ) येथील ऋतुजा संपतराव भोसले हिची आशियाई टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बार्शीची टेनिसकन्या प्रार्थना ठोंबरे हिच्या पाठोपाठ आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेसाठी निवड झालेली ऋतुजा सोलापूर जिल्ह्यातील दुसरी कन्या ठरली आहे. ऋतुजाच्या निवडिमुळे जिल्ह्यात टेनिस खेळ आणखी रुजण्याची अपेक्षा आहे. लवंग ( ता माळशिरस ) सारख्या छोट्याश्या खेड्यातून आलेल्या ऋतुजाचे वडील पोलीस निरिक्षक आहेत. लहानपणा पासून व्यायाम आणि खेळाची आवड असलेल्या ऋतुजाची टेनिस खेळातील रुची पाहून तिला सरावासाठी पुण्यातील बोट क्लबमध्ये पाठवण्यात आले होते. वयाच्या 9 व्या वर्षापासून लॉन टेनिस सुरू केल्यामुळे ऋतुजाची राज्यस्तरीय टेनिस स्पर्धेत निवड झाली. त्यानंतर 10, 12, 14 आणि 16 वर्षीय गटात ऋतुजाची राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. 15 व्या वर्षी ऋतुजाने कनिष्ठ गटातून आशियाई स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे.
यापूर्वीच ऋतुजाची कनिष्ठ गटात राष्ट्रिय संघात निवड झालेली आहे. वयाच्या 15 व्या वर्षी ऋतुजा ने भारतीय टेनिसकन्या तारका सानिया मिर्झा सोबत फेडरेशन चषकात सहभाग घेतला आहे. सध्या ऋतुजा जागतिक कनिष्ठ गटात 55 व्या क्रमांकावर आहे. ऋतुजाची अमेरिकेच्या टेकसास विद्यापीठाने 4 वर्षांची फेलोशिप दिली होती. गत वर्षी अमेरिकेच्या टेनिस फेडरेशनने ऋतुजाला अमेरिकेकडून खेळण्याची ऑफर दिली होती मात्र ऋतुजाने भारताकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ऋतुजाला भारतीय टेनिसमध्ये 3 री रँक असून महाराष्ट्र कनिष्ठ गटात ती नंबर वन रँक मिळवलेली आहे. आता ऋतुजाची भारतीय संघात आशियाई टेनिस स्पर्धेत निवड झाली आहे. याबद्दल ऋतुजाचे आणि तिच्या पालकांचे अभिनंदन होत आहे.
एकुलती एक कर्तबगार लेक
विशेष म्हणजे पोलीस खात्यात असलेल्या संपतराव भोसले यांना ऋतुजा ही एकुलती एक लेक आहे. ऋतुजाच्या जन्मानंतर भोसले दाम्पत्याने कुटुंब नियोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. भोसले कुटुंबाची एकुलती एक लेक कर्तबगार असल्याचे सिद्ध झाले आहे. प्रार्थना ठोंबरे नंतर जिल्ह्याची दुसरीच सुकन्या बार्शीची प्रार्थना ठोंबरे हिने यापूर्वी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत जिल्ह्याचे नाव झळकावले असून तिच्या पाठोपाठ आता ऋतुजा भोसले हिने जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे.
पंढरपूर Live कडून ॠतुजाचे अभिनंदन व शुभेच्छा!

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments