उद्या पंढरपूर नगरपरिषदेच्या विविध विकास कामांचा शुभारंभ

उद्या पंढरपूर नगरपरिषदेच्या विविध विकास कामांचा शुभारंभ 

पंढरपूर LIVE 5 Jun 2018

उद्या दि. 6 जुन 2018 रोजी पंढरपूर मधील श्रीसंत तनपुरे महाराज मठामध्ये पंढरपूर नगरपरिषदेच्या पंढरपूर  शहरातील विविध विकास कामांचा भुमिपुजन समारंभ संपन्न होणार असल्याची माहिती पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले यांनी पंढरपूर लाईव्ह शी बोलताना दिली.

राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेअंतर्गत पंढरपूर शहरातील विस्तारीत भागात भुयारी गटार योजनेचा टप्पा क्र. 3 अंतर्गत ची कामे (रू.59 कोटी 75 लाख), स.न. 100 येथे 14 व्या वित्त आयोग निधीतून स्वच्छ भारत अभियान घनकचरा व्यवस्थापन योजनेअंतर्गत विविध विकासकामे  (रू. 9 कोटी 42 लाख), वैशिष्टय़पूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत आ.क्र. 53 येथे नामसंकीर्तन सभागृह (नाट्यगृह) बांधणे (रू. 39 कोटी 43 लाख) आदी विकास कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

पंढरपूर न.प. च्या सत्ताधारी गटाचे नेते तथा सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक यांनी निवडणुकीपूर्वी पंढरपूरकरांना दिलेल्या आश्वासनांची पुर्ती करण्यासाठी पंढरीतील विविध विकासकामे तडकाफडकी मार्गी लावण्याचा धडाका सुरू केल्याचे याद्वारे दिसून येत आहे.

या समारंभाचे उद्घाटन पांडुरंग साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली व नगरविकास राज्यमंत्री ना. डाॅ. रणजीत पाटील, पालकमंत्री ना. विजयकुमार देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

आ.प्रशांतराव परिचारक, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे अध्यक्ष उमेशराव परिचारक, मर्चन्ट बँकेचे चेअरमन नागेशकाका भोसले यांची प्रमुख उपस्थिती या समारंभास लाभणार आहे.

सर्वांनी या समारंभास उपस्थित रहावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांनी केले आहे.







महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments