पंढरपूर LIVE 27 Jun 2018
29 जुन ला पुण्यातील मोर्चात सहभागी होण्याचे केले आवाहन..!
पंढरपूर लाईव्हवर अवश्य बघा हा स्पेशल व्हिडीओ रिपोर्ट!
पंढरपूर लाईव्ह वरील सर्व व्हिडीओ बातम्या पहाण्यासाठी
सबस्क्राईब करा आमचे Pandharpur Live यु ट्युब चॅनल
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे शेतकरी मेळावा संपन्न झाला. शेतकर्यांच्या प्रश्नासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येत्या 29 जुन ला पुणे येथे शेतकर्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासंदर्भात माहिती देण्यासाठी स्वाभिमानी चे नेते राजु शेट्टी व प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 27 जुन रोजी पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकर्यांच्या बैठकी संपन्न झाल्या. यानंतर सरकोली येथे शेतकरी मेळाव्यात राजु शेट्टी व रविकांत तुपकर यांनी शासनाच्या शेतकर्यांविषयीच्या अनास्थेबाबत व शेतकर्यांच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षांबाबत आपली भुमिका स्पष्ट केली. यावेळी निवास भोसले यांना जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवडल्याचे पत्र राजु शेट्टी यांनी दिले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, माजी उपसभापती विष्णू बागल, जिल्हा अध्यक्ष समाधान फाटे, महामुद पटेल, जि.कार्यअध्यक्ष शिवाजी पाटील, विजय रणदिवे, ता.अध्यक्ष तानाजी बागल, युवा आघाडी तालुका अध्यक्ष सचिन पाटील, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष राहूल घुले, स्वाभिमानी पक्ष ता.अध्यक्ष नवनाथ माने, किर्तीकुमार गायकवाड, अमर इंगळे, विश्रांती भुसनर, निवास भोसले आदी उपस्थित होते. या मेळाव्यास चळे,आंबे,रांझणी,ओझेवाडी,नेपतगाव,पुळूज,शंकरगाव,उचेठान बठाण आदी गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांची ऊसाची 248 कोटी येणे असताना एकाही कारखान्यानी एफआरपी पूर्ण केली नाही, उसाचा वजन काटा मारणे , रिकव्व्हरी कमी दाखवणे आणी भविष्यात ऊस दर रास्त मिळवायचा असेल तर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे त्यामुळे ऊसाला एफआरपीची राहिलेली रक्कम मिळावी, दुधाचे पर लिटर 5 रु. अनुदान थेट शेतकर्यांच्या खात्यात जमा करावे व शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी करुन शेतीमालाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी दिनांक 29 जुन रोजी पुणे येथे होणार्या आंदोलनाला शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राजु शेट्टी यांनी यावेळी केले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments