पंढरपूर LIVE 28 Jun 2018
पंढरपूर प्रतिनिधी
कवितासागर साहित्य अकादमी जयसिंगपूर (कोल्हापूर) यांच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा राष्ट्रीय साहित्य पुरस्कार शेळवे (पंढरपूर)येथील युवा साहित्यिक अंकुश गाजरे यांच्या 'अनवाणी' या आत्मकथनास नुकताच प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र, ग्रंथ व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हा पुरस्कार प्रत्येक वर्षी मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषेमधील साहित्यकृतींना राष्ट्रीय स्तरावर देण्यात येतो. त्यात मराठी भाषेसाठी अंकुश गाजरे यांच्या "अनवाणी"आत्मकथनाची निवड करण्यात आली होती. नुकताच हा पुरस्कार प्रदान सोहळा कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला...
या आधी "अनवाणी" आत्मकथानाला "वसंतराव काळे साहित्यकृती पुरस्कार", दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा "ग्रंथ पुरस्कार", मनोरमा मंडळी सोलापूरचा "मनोरमा साहित्य पुरस्कार" या पुरस्कारांसह एकूण अकरा पुरस्कार मिळालेले आहेत.लेखक अंकुश गाजरे यांचे अनवाणी (आत्मकथन),वनवास (कथासंग्रह) आठवणी जपलेल्या (ललित संग्रह) ,आणि गावमातीतली माणसं (व्यक्तिचित्र संग्रह)ही पुस्तके प्रकाशित आहेत.पुरस्कार मिळाल्याबद्दल जेष्ठ साहित्यिक डॉ.द.ता.भोसले, आमदार दत्तात्रय सावंत, प्रा.राजेश पवार, प्रा.रामचंद्र आसबे, मा.कल्याणराव शिंदे, कवी गणेश गायकवाड, हरिश्चंद्र पाटील व सर्व साहित्यरसिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments