आमदार रमेश कदम यांच्या पाठपुराव्यातून पंढरपूर तालुक्यातील 17 गावांना मिळणार हायमास्ट दिवे!

पंढरपूर LIVE 8 July 2018


मोहोळ विधानसभा मतदार संघाच्या पंढरपूर तालुक्यातील 17 गावांना आमदार रमेश कदम यांच्या पाठपुराव्यामुळे हायमास्ट दिवे मिळणार आहेत. हे दिवे बसविण्यासाठी 26.76 लाखांच्या प्रशासकीय निधीस नुकतीच मान्यता मिळाली आहे.

आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सन 2018-19 या आर्थिक वर्षात या निधीला मान्यता मिळाली आहे. आमदार रमेश कदम तुरुगांत असले तरी त्यांनी मतदार संघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी आघाडी घेतल्याचे  दिसून येते. शासनाशी वारंवार पत्रव्यवहार करुन त्यांनी हा निधीमिळविला असल्याचे समजते.

या निधीतून नळी, खरसोळी, ओझेवाडी, फुलचिंचोली, आंबेचिंचोली, नेपतगाव, पुळुजवाडी, शंकरगाव, सरकोली, मगरवाडी, तारापूर, कोंढारकी, पोहोरगाव, पुळुज आदी गावातील विविध वाड्यावस्त्या व दलित वस्त्या आमदार रमेश कदमांच्या प्रयत्नामुळे उजळणार आहेत.



  











महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments