बारामतीत सामाजिक संस्थांकडून वारकर्‍यांसाठी विविध सेवा-सुविधा

पंढरपूर LIVE 14 July 2018

पंढरीच्या वाटेवर असणाऱ्या पालख्या शुक्रवारी बारामतीत दाखल झाल्या. पालखीमधील वारकऱ्यांच्या स्वागतासाठी शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, व्यक्तींनी जय्यत तयारी केली होती. या पालखीत प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिश‌व्यांचे वाटप करण्यात आले. वारकऱ्यांचा पुढचा प्रवास सुरळीत व्हावा या हेतूने सेवाभावी संस्थांनी त्यांची वैद्यकीय तपासणी देखील केली.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार "कृषी पंढरी" कृषी महोत्सव-2018 "भव्य कृषी प्रदर्शन" बघा (जाहिरात


वारकऱ्यांचे स्वागत करताना अनेकांनी त्यांना प्रवासात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचे वाटप केले. गेल्या 10 वर्षांपासून सिध्दीगणेश प्रतिष्ठानच्या वतीने बारामती शहरातील भिगवण चौक येथे वारकऱ्यांसाठी सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबीराचे देखील आयोजन करण्यात आले होते. 


दरवर्षी दिंडीमध्ये आलेल्या वारकर्‍यांना अन्नदान, प्रथोमोपचार पेट्यांचे वाटप, आरोग्य शिबिरे, मोफत उपचार आदी सेवा देण्यात येतात. याच भवनेने ससून रुग्णालयाच्या सहकार्याने २० तज्ञ डॉक्टरांनी वारकऱ्यांची प्रत्यक्ष तपासणी होण्यासाठी आपली सेवा दिली.

  








महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments