पंढरपूर LIVE 8 July 2018
अल्ला देवे अल्ला दिलावे। अल्ला दारू अल्ला खिलावे।। अल्ला बिगर नहीं कोय । अल्ला करे सोहि होय ।।
हे शब्द आहेत जगतगुरू तुकोबारायांचे. समस्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठूरायाच्या भेटीसाठी आसुसलेल्या वारकरी संप्रदायाच्या सणाला म्हणजेच पंढरपूरच्या वारीला सुरुवात झाली आहे.
जगतगुरू तुकारामांच्या 333व्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाप्रसंगी देहू नगरीत भक्तांचा जनसागर लोटलाय. पहिल्या दिवशी तुकोबारायांची पालखी देहूमध्येच इनामदारवाड्यात मुक्कामास थांबते.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही पालखी आकुर्डी गावाकडे प्रस्थान करते.
विशेष म्हणजे हे प्रस्थान करत असताना देहू गावाबाहेर असलेल्या हजरत सैययद अनगडशाह बाबा यांच्या समाधीवर एक थांबा ठरलेला असतो.
बाबा अनगडशाह यांच्या समाधीसमोर तुकोबारायांची आरती होते. त्यांचे अभंग म्हटले जातात आणि त्यानंतर ही पालखी पुढे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते. अगदी तासा-दोन तासांचा हा प्रसंग हिंदू-मुस्लीम सलोख्याचं महत्त्वाचं प्रतीक मानला जातो.
आम्हाला या संपूर्ण सोहळ्याबद्दल अधिक माहिती संत तुकारामांचे नववे वंशज प्रकाश मोरे यांनी दिली. प्रकाश मोरे गेल्या चौदा वर्षांपासून पंढरीची वारी करत आहेत. तुकोबा आणि अनगडशाह यांच्या या भेटीबद्दलची एक आख्यायिका प्रकाश सांगतात.
"सोळाव्या शतकात महाराष्ट्रात आपल्यापेक्षा श्रेष्ठ दुसरा कुणीच संत नाही, असा अभिमान अनगडशाह यांना झाला होता. तेव्हा तुकाराम महाराजांचे नाव लौकीक ऐकून अनगडशाह देहू या गावी त्यांची परीक्षा घेण्यासाठी आले. अनगडशाहांजवळ भिक्षेचं एक पात्र होतं, त्यामध्ये पोतंभर धान्य टाकलं तरी ते भरत नव्हतं."
"ते तुकारामांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले. मात्र तुकोबा तेव्हा घरी नव्हते. तेव्हा तुकोबांची कन्या भागिरथी हिने अनगडशाह यांच्या पात्रात चिमूटभर पीठ टाकलं आणि ते भिक्षा पात्र पूर्णपणे भरलं. तेव्हा भागिरथीच तुकाराम आहे की काय, असं अनगडशाह यांना वाटलं, आणि त्यांनी भागिरथीला तसं विचारलंही. भागिरथी म्हणाली मी त्यांची कन्या आहे. माझे बाबा डोंगरावर नामस्मरणासाठी गेले आहेत," ते सांगतात.
तेव्हा अनगडशाह बाबा यांना तुकाराम महाराजांची प्रचिती आली. पुढे अनगडशाह बाबा यांनी तुकारामांचे शिष्यत्व स्वीकारलं आणि देहूतील अंधेरीबाग या ठिकाणी अनगडशाह कायमस्वरूपी राहिले, असं मोरे सांगतात.
याच ठिकाणी मागील 300 पेक्षा जास्त वर्षांपासून तुकोबारायांची पालखी थांबते आणि तिथेच त्यांची पहिली आरती होते. तसंच लाखोंच्या संख्येने हिंदू भाविक अनगडशाह यांचंही दर्शन घेतात. "या हिंदू-मुस्लीम ऐक्याचं असं प्रतीक या देहू गावातच पाहायला मिळतं," मोरे सांगतात.
आम्ही पुढे बाबा अनगडशाह यांच्या समाधीच्या दिशेने निघालो. गावातून बाहेर पडतानाच डाव्या बाजूला अनगडशाह यांची समाधी लागते. समाधीसमोरच तुकोबारायांच्या पालखीच्या विसाव्यासाठी एक छोटंसं मंडप बांधला आहे. अनगडशाह यांच्या समाधीजवळ आमची भेट समाधीस्थळाचे पुजारी गोविंद मुसुडगे यांच्याशी झाली.
गोविंद मुसूडगे आठ वर्षांपासून इथे पुजारी आहेत. त्यांचे वडील आणि आजोबासुध्दा या दर्ग्याचे पुजारी होते.
तुकाराम-अनगडशाह यांच्या या भेटीबद्दल आम्ही गोविंद यांना बोलतं केलं. ते म्हणाले "इनामदारवाड्यात पहिल्या दिवशी मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 11 वाजता तुकोबारायांची पालखी निघते. ही पालखी खांद्यावर आणली जाते. पालखी या दर्ग्यापर्यंत पोहोचायला साधारणतः एक दीड तास लागतो. बारा-साडेबारापर्यंत पालखी इथे पोहोचल्यानंतर तुकोबांची आरती होते, अभंग म्हटले जातात. त्यानंतर पालखी पुढे जाते."
या धार्मिक सलोख्याच्या प्रसंगाबद्दल मुसुडगे सांगतात, "मे महिन्यात अनगडबाबांचा उरूस भरतो. त्यावेळी सर्व जातीधर्मांचे लोक इथे येतात. या सर्व धर्मियांच्या पुढाकारातून हा उरूस भरवला जातो. तसेच अन्नदानाचा कार्यक्रमही असतो."
दरवर्षी नित्यनेमाने होणारा हा कार्यक्रम पाहाण्यासाठी अनेक भाविक देहू गावात गर्दी करतात. आजही हे गुरू शिष्य दरवर्षी भेटतात तेव्हा आजही तुकोबाराय लोकांना धर्माची बंधनं तोडून भक्ती आणि प्रेमाचा मार्ग दाखवत असल्याचं जाणवतं.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments