कार्यकर्त्यांनी गटा-तटाच्या राजकारणात पडू नये : खा. बनसोडे

पंढरपूर LIVE 8 July 2018

पंढरपूर (प्रतिनिधी) : कार्यकर्त्यांनी राजकीय नेत्यांच्या गटा-तटाच्या राजकारणात न पडता, रस न दाखविता समाजासाठी आवश्यक असणारी जास्तीत जास्त कामे जिल्ह्यातील सर्वच नेत्यांकडून करून घ्यावीत, असे सूचनावजा आदेश खा. शरद बनसोडे यांनी दिले.



  

दोन दिवसांपूर्वी खा. शरद बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टी शहर व तालुक्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहराध्यक्ष संजय वाईकर, तालुकाध्यक्ष श्रीकांत बागल, माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे, बाबा बडवे, उमेश वाघोलीकर, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगदाळे यांच्यासह विविध आघाड्यांचे प्रमुख, सेल व मोर्चाचे प्रमुख उपस्थित होते.  यावेळी अ‍ॅड. बनसोडे यांनी नुकत्याच झालेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमधील दोन देशमुखांमधील झालेल्या निवडणुकीचा धागा पकडत कार्यकर्त्यांनी कोणत्याही नेत्याकडे जाऊन आपली कामे करून घ्यावीत. एकाच नेत्याच्या मागे धावल्यास दुसर्‍या नेत्यांना संबंधित कार्यकर्ते हे त्याच नेत्याचे कार्यकर्ते आहेत, असा समज होतो. त्यातून कार्यकर्त्यावर संबंधित नेत्याचा शिक्का पडतो व उर्वरीत नेते संबंधित कार्यकर्त्याकडे तो दुसर्‍या गटाचा आहे, असे समजून त्याची कामे करत नाहीत. यातून कार्यकर्त्यांची कोंडी होते. कार्यकर्त्यांनी सत्तेचा उपयोग आपल्या स्वत:च्या हितासाठी न करता समाजाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात करावा. यासाठी सर्वच नेत्यांशी सकारात्मक संपर्क ठेवणे गरजेचे आहे. मी स्वत: तरी कोणताही गट-तट न मानता माझ्याकडे येणार्‍या प्रत्येकाचे काम करण्याचा प्रयत्न करतो. कार्यकर्त्यांनीही आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन समाजातील गोरगरीबांची कामे झाली पाहिजेत, यासाठी सर्वच नेत्यांकडे जाऊन आपली कामे करून घ्यावीत, असे आवाहन केले.
ज्या दिवशी मी खासदार म्हणून निवडणून आलो, त्याच दिवसापासून पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पंढरपूर शहराबाबत मी संपर्काला थोडा कमी पडलो, हे जरी खरे असले तरी आगामी आठ महिन्यात मी सातत्याने पंढरपूरच्या विकासाकडे लक्ष देईन.
पंढरपूर-मुंबई रेल्वे दररोज सुरू करण्याबाबत येणार्‍या लोकसभेत मी आवाज उठवेन, पंढरपूरचे नाव केंद्रीय पर्यटन सूचित समाविष्ठ करण्यासाठी तसेच पंढरपूर शहराच्या अमृत योजनेत सहभाग होण्याकरीता मी पाठपुरावा करेन, पंढरपूरसाठी केंद्राचा जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न मी निश्चित करेन, असे आश्वासन यावेळी खा. बनसोडे यांनी उपस्थितांना दिले. कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न खा. बनसोडे यांनी केला.
या बैठकीचे प्रास्ताविक संजय वाईकर यांनी केले. श्रीकांत बागल यांनी आभार मानले. या बैठकीत डॉ. प्राजक्ता बेणारे, देवयानी दामोदरे, उमेश वाघोलीकर आदींनी आपले विचार मांडले.

नुतन नगरसेवक भैय्या पवार यांचा सत्कार

भाजपाचे खा. शरद बनसोडे यांच्या बैठकीदरम्यान पंढरपूर नगरपरिषद प्रभाग 10 ब मधील पोटनिवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेले भैय्या पवार या नुतन नगरसेवकाचा खा. शरद बनसोडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. या निवडणुकीत भाजपाकडे सक्षम नगरसेवक असतानाही ज्या परिस्थितीमध्ये या प्रभागाची पोटनिवडणूक होत आहे, हे लक्षात घेऊन भाजपाने उमेदवार न देता भैय्या पवार यांनाच पाठींबा दिला होता, असे यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी सत्कारप्रसंगी बोलताना सांगितले.












महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments