मंगळवेढ्यातील डवरी समाजावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गरजले आमदार भारतनाना भालके

पंढरपूर LIVE 9 July 2018

राइनपाडा मध्ये  घडलेल्या हत्याकांडा नंतर दिलेली आश्वासने तात्काळ अमलात आणली जावीत यासाठी आपण काय करणार आहात असा सवाल राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस याना  आ भारत भालके यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे आक्रमकपणे मांडत नाथपंथी डवरी समाजावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली.

पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार "कृषी पंढरी" कृषी महोत्सव-2018 "भव्य कृषी प्रदर्शन" बघा (जाहिरात)

 
सोमवारी अधिवेशनातील कामकाजात धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या तालुक्यातील चौघावर मुले पळवणारी टोळी समजून अमानुष अत्याचार आणि पाशवी मारहाण केल्याने  मृत्यूमुखी पडलेल्या नाथपंथी डवरी समाजातील दादाराव भोसले भारत माळवे भारत भोसले तर मानेवाड़ी येथील आप्पा इंगोले याना आपला जीव गमवावा लागला आहे 

या बाबत आ भारत भालके यांनी अधिवेशनात या समाजावर झालेल्या हत्याकांडाचा प्रश्न उपस्थित करीत पायाखाली मुंगी सुद्धा मरणार नाही अशी वागणूक असणारा हां भिक्षा मागणारा समाज भूमी हिन व दारिद्र्य रेशेखाली जीवन जगत असुन जगण्या साठी जीव गमावावा लागला आदिमानवा च्या काळात सुद्धा अशा पद्धतीने क्रूर हत्या होत नव्हत्या मात्र ही घटना सुन्न करणारी आहे या वेळी पोलिस काय करत होते असा सवाल करण्यात आला अजुन किती  निष्पाप मरणार आहेत यात तीनशे पेक्षा अधिक जमावातील मारेकरी असताना अद्याप फ़क्त २५ लोकांना अटक झाली हे काम गतीने झाले पाहिजे 

सरकारने दिलेल्या मदतीच्या आश्वासनाचे काय झाले शिक्षणा पासून वंचित असलेला हां घटक तुम्ही नोकरी मध्ये कसा सामावून घेणार आहात आर्थिक मदत देखील तुटपूंजी असुन त्याना २५ लाखांची मदत मिळावी तसेच त्याना जमीन घरकुल शासकीय नोकरी इ आश्वसनाची त्वरित पूर्तता कारावी आपल्याकड़े या समाजाची आकडेवारी उपलब्ध नाही सर्व सोयी पासून हा समाज वंचित राहिला आहे पारधी समाज विकास आराखड्याच्या धर्तीवर नाथपंथी डवरी गोसावी  जमाती च्या विकासासाठी विशेष आराखडा करावा त्यांच्या उन्नती साठी दर वर्षी ५०० कोटीची तरतूद अर्थसंकल्पात करावी अशा व्यथा मांडत आ भालके यांनी सभागृह स्तब्ध केले 

या वेळी फडणवीस यांनी भटक्या नाथपंथी डवरी समाजाच्या समस्या बाबत कायमस्वरूपीउपाययोजना करण्यासाठी विकास आराखडा निर्माण करणार आहे या घटनेतील आरोपीना तात्काळ शिक्षा मिळण्यासाठी आ भारत भालके यांनी केलेल्या मागणी प्रमाणे सदर खटला जलदगति न्यायालयात चालवुंन अड़ उज्वल निकम याना सरकारी पक्ष मांडण्यासाठी नियुक्ती देऊ तसेच यातील २५ आरोपीना अटक केली असुन उर्वरित आरोपीना लवकर अटक केली जाईल जास्तीत जास्त कठोर शासन करीत न्याय देणार आहोत नाथपंथी डवरी समाजाच्या घरकुल अडीच टक्के आरक्षण दारिद्र्य रेषेखालील कार्ड शासकीय ओळखपत्र शिक्षण आदि प्रश्नाबाबत येत्या आठ दिवसात बैठक घेवून कायम स्वरूपी उपाययोजना राबविल्या जातील या शिवाय जी आश्वसने दिली आहेत त्याची पूर्तता लवकर केली जाईल असे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आ भारत भालके यांच्या स्थगन प्रस्तावावर उत्तर देताना सांगितले





  











महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments