पावसाळी अधिवेशनात आमदार भारतनाना भालकेंनी सरकारवर केला प्रश्‍नांचा भडीमार... अनेक समस्या पटलावर आणल्या!

पंढरपूर LIVE 11 July 2018


पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार "कृषी पंढरी" कृषी महोत्सव-2018 "भव्य कृषी प्रदर्शन" बघा (जाहिरात)


महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या वतीने पंढरपुर मंगळवेढा विधानसभेचे आ भारत भालके यांनी शेतकऱ्यांच्या वीज, पाणी, शेतमाल दर, खरीपपीक विमा, कर्जमाफी शेतकरीआत्महत्या या विषयावर सरकारला चांगलेच धारेवर धरत कलम २९३ अन्वेय प्रश्नाचा भडिमार करत अनेक समस्याना पटलावर आणल्याने सभागृहात जोरदार चर्चा झाली 

अधिवेषणाच्या सहाव्या दिवशी बुधवारी सकाळी आ भारत भालके यांनी १७००० शेतकऱ्यांना आपले प्राण शासनाच्या उपयुक्त नसलेल्या धोरनाने गमवावे लागल्याचे सांगत अजूनही हे सत्र सुरु आहे यावर काय करणार आहात असा प्रश्न मांडला 

मंगळवेढा हा ज्वारी साठी प्रसिद्ध आहे माझा शेतकरी आज तोट्यात शेती करीत आहे १७२५ हमिभाव चा आहे त्यात त्याचा खर्च २००० च्या वर आहे कसा जगणार शेतकरी आता २४५० हमीभाव दिला असला तरी तो पुरेसा नाही तुर असो किंवा साखर सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आयातीकरणामुळे साखर उद्योगाचे कम्बरडे मोडले आहे सोलापुर जिल्ह्यात वखार महामंडळाकड़े गोदाम उपलब्ध नसल्याने नाफेड हमी भावाने खरेदी केलेली सुमारे १० हजार क्विटल तुर तिथेच पडून आहे बाहेरून आयात तुरिचा फटका माझ्या जिल्ह्याला बसला आहे याला सरकारचे धोरण कारणीभूत आहे  ऑनलाइन कारभार जनतेच्या समस्या वाढवण्यासाठी सुरु केला असल्याचे जाणवत आहे सात बारा सर्व प्रकारचे दाखले आता नेट अभावी मिळत नाही दैनंदिन व्यवहार ठप्प आहेत असे 

लक्षात आणून दिले

२०१७ च्या खरीप पीक विमा योजनेत ५३ हजार ७४६ शेतकरी मंगळवेढा तालुक्यातील आहेत ज्याना नुकसान भरपाईतून वगळले आहे १ कोटी ७७ लाख रूपये गोळा केले मात्र एक रुपया सुद्धा दिला नाही असे विचारता ५ वर्षाचा सरासरी पर्जन्यमान आणि पीक कापनी अहवाल हां चालु वर्षी जास्त असल्याने भरपाई देता येत नाही असे सांगितले मात्र जिल्ह्यात २ तालुके समाविष्ट केले  त्या भागात मंगळवेढ्यापेक्षा जास्त पर्जन्यमान जास्त असल्याचे लक्षात आणून दिले आणि ही पीक विमा भरपाई मिळाली पाहिजे पीक विमा कंपन्या जगवु नका असे म्हणाले

 सन १७ आणि-१८ च्या वादळी वाऱ्यात गारपिटात फळबागा उध्वस्त झाल्या घरे पडली सबंधित मंत्री आले फिरून गेले पंचनामे केले मात्र मदत अद्याप नाही 

शासनाने गाजावाजा करीत कर्जमाफी केली पण ५० टक्के रक्कम सुद्धा पूर्ण केली नाही कर्नाटक सारखे राज्य दोन वेळा माफ़ी देते चळे (ता पंढरपुर) येथील ४० शेतकऱ्यांनी कर्जमाफी साठी दीड लाख रक्कम बँकेत भरली मात्र आज वर शासनाने रक्कम भरली नाही त्यामुळे किडुक मिडुक करत भरलेल्या शेतकऱ्याला भिक नको पण कुत्रा आवर म्हणण्याची वेळ आली आहे सहकार विभागं अर्ज दया कर्ज घ्या म्हणतो मात्र २ वर्षात एकही नव्याने कर्ज नाही 

वीज वितरणचा कारभार भोंगळ असुन पेड़ पेंडिंग च्या जोडण्या झाल्या नाहीत रोहित्र उपकेंद्र कामे अपूर्ण आहेत ओवरलोड टार्न्सफार्म बदलणे आवश्यक आहेत शिवाय न वापरलेली वीज बिले माफ़ झाली पाहिजेत असा आग्रह धरला 

भीमा नदी काठी १०० पेक्षा जास्त गावे आहेत पाणी आल की वीज बंद केली जाते बंधाऱ्याची दारे उघडली जातात भीमा नदी माण नदी बाबत अधिकाऱ्यांची मनमानी सुरु आहे पुनर्वासित शेतकऱ्यांना पाणी देण्याचा कायदा असताना त्याना पाणी मिळत नाही आता या दोन्ही नद्याना कॅनॉल चा दर्जा देत पाणी सोडण्याची तरतूद करावी असे सांगत मतदार संघातील या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले 



  








महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments