पंढरपूर LIVE 11 July 2018
पंढरपूर येथे आषाढी वारीच्या निमित्ताने कृषी उत्पन बाजार समिती व शुअर शॉट इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या ३ वर्षापासून कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. वारीला येणारे बहुतांश भाविक शेतकरी असतात व प्रदर्शनाच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान व प्रात्याक्षिके यांच्या नाविन्यपूर्ण मांडणीमुळे कृषी पंढरी कृषी प्रदर्शन हे आता वारकऱ्यांचे आकर्षण बनू लागले आहे. या प्रदर्शनातील मुख्यमंत्र्यांची सभा व सभेतील सरकारच्या घोषणेकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले असते.
आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरला भेट देणाऱ्या तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शनाकडे जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी यावर्षी १० रुपयांच्या कुपनमधून एका भाग्यवान विजेत्याला ट्रॅक्टर जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या वर्षी या प्रदर्शनामध्ये प्रात्याक्षिके दालनासोबतच देशी गायींचे प्रदर्शन देखील आकर्षण ठरणार आहे. यंदा हे प्रदर्शन दिनांक २१ ते २५ जुलै दरम्यान होत असून या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. २२ जुलै रोजी संपन्न होणार आहे. प्रदर्शनामध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे संवाद वारी हे शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे विशेष दालन सहभागी करण्यात आहे आहे. याशिवाय सेंद्रिय शेतमाल महोत्सव व महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी विशेष दालन उभारणी करण्यात आली आहे. विविध नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाबरोबरच देशी बियाणे प्रदर्शन, आगर्वूड लागवड, शेततळ्यातील मोत्यांची शेती, बांबू लागवड, शेळीपालन, मधमाशी पालन आदी विषयावरील माहितीपूर्ण संस्था यावर्षी सहभागी होत आहेत.
हे प्रदर्शन जास्तीत जास्त यशस्वी करण्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, उपसभापती विवेक कचरे तसेच संचालक मंडळ व इव्हेंट कंपनीचे प्रतिनिधी विविध नाविन्यपूर्ण बाबींचा समावेश जास्तीत जास्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार "कृषी पंढरी" कृषी महोत्सव-2018 "भव्य कृषी प्रदर्शन" बघा (जाहिरात)

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments