पालखी मुक्काम व पंढरपुरात मद्य विक्री मनाई

पंढरपूर LIVE 10 July 2018

सोलापूर दि.10 :-  आषाढी यात्रा पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात व पालखी मुक्कामाच्या ठिकाणी शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 मधील कलम 142 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार पंढरपूर शहर व पालखी मुक्कामाच्या ठिकाणाची सर्व मद्य विक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार "कृषी पंढरी" कृषी महोत्सव-2018 "भव्य कृषी प्रदर्शन" बघा (जाहिरात)


आदेशानुसार पंढरपूर शहरात आषाढी एकादिशी निमित्त दिनांक 22 जुलै ते 24 जुलै 2018 या कालावधतीत सर्व मद्य विक्री अनुज्ञप्ती बंद ठेवावीत. तसेच दिनांक 26 ते 27 जुलै 2018 कालावधीत पंढरपूर शहरात सायंकाळी पाच नंतर मद्य विक्री दुकाने बंद ठेवावीत.
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणी दिनांक 17 जुलै 2018 रोजी- नातेपुते, दिनांक 18 जुलै 2018 रोजी  माळशिरस, अकलूज, दिनांक 19 जुलै 2018 रोजी वेळापूर, बोरगाव, श्रीपूर, माळीनगर, दिनांक 20 जुलै 2018 रोजी भंडीशेगाव, पिराची कुरोली आणि दिनांक  21 जुलै 2018 रोजी वाखरी येथील सर्व मद्य विक्री अनुज्ञप्ती पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आषाढी यात्रेच्या अनुषंगाने 22 ते 24 जुलै 2018 पंढरपूर शहरापासून 5 कि.मी. परिसरातील देशी, विदेशी मद्य विक्री परवाना कक्ष अनुज्ञप्ती पूर्ण दिवस आणि दिनांक 26 ते 27 जुलै 2018 कालावधीत सायंकाळी 5 वाजेनंतर बंद ठेवावीत, असेही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आदेशात नमूद केले आहे.



  











महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments