भाऊजी झाले ट्रॅफीक हवालदार... भरपावसात आदेश बांदेकर वारकर्‍यांच्या सेवेत..

पंढरपूर LIVE 10 July 2018


सूत्रसंचालक, चित्रपट अभिनेता, नाट्य कलाकार तर कधी राजकीय नेता अन आता राज्य शासनाचे राज्यमंत्री असलेले सिद्धी विनायक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर आज पडत्या पावसात दिवे घाटातील वारकर्‍यांचे सेवेसाठी चक्क रस्त्यांवर ट्रॅफिक पोलिसांची भूमिका बजावताना दिसून आले. 
बघा पंढरपूर Live स्पेशल व्हिडीओ रिपोर्ट...


 भावजी या नावाने अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेले आदेश बांदेकर काल दिवेघाटात ट्रॅफीक हवालदाराच्या भूमिकेत पाहयला मिळाले...चित्रपट, टीव्ही सिरीयल, राजकारण आणि समाजकारणात आदेश बांदेकर यांचा दबदबा आहे पण काल वारकर्‍यांच्या मदतीसाठी भर पावसात धावून जाणं अनेकांना भावलं...त्याच असं झालं भाऊजी एका शो च्या शूटच्या निमित्ताने दिवे घाटात गेले होते. 
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार "कृषी पंढरी" कृषी महोत्सव-2018 "भव्य कृषी प्रदर्शन" बघा (जाहिरात)


दरम्यान पंढरपूर कडे प्रस्थान ठेवलेल्या संतांच्या पालख्या या  घाटात पोहचल्या, संपूर्ण घाट वारकरी आणि त्यांच्या वाहनांनी जाम झाला. घाटात अडकलेल्या वारकरी भाविकांना पुढेही जाता येईना आणि मागेही...वाहतूक सुरळीत करण्याचे पोलिसांचे प्रयन्त तोडले पडू लागले पावसाची रिपरिप आणि खोळंबलेल्या वाहतुकीमुळे आबालवृद्ध बेहाल झाले. वारकर्‍यांचे हाल पाहून भाऊजी पोलिसांच्या मदतीला धावून आले आणि वाहतूक सुरळीत करण्याच्या कामाला लागलेङ्गवारकर्‍यांना हात जोडून एका बाजूने चालण्यास सांगून मोठ्या गाड्यांना रस्ता करून पावसाची तमा न बाळगता, आपण सेलिब्रेटी आहोत शिवसेनेचे नेते आहोत सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री आहोत हे सगळं विसरून आदेश बांदेकर यांनी ट्रॅफिक हवालदाराच्या भूमिकेत शिरलेङ्गवाहतुकीच्या सूचना देणारे पोलीस नसून आपले लाडके भाऊजी आहेत आणि ते आपल्याला विनंती करीत आहेत म्हटल्यावर वारकर्‍यांनी हसतमुखाने सूचनांचे पालन केलेङ्गपावसाची तमा न बाळगता आपण कोण आहोत हे विसरून बांदेकरांनी केलेली ट्रॅफिक हवालदाराची भूमिका सच्चा शिवसैनिक असल्याची पोहच आहे....



  











महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments