पंढरपूर LIVE 20 आॅगस्ट 2018
ऑनलाईन असण्याचे फायदे व तोटे यासंदर्भात त्या त्या क्षेत्रातील तज्ञ मंडळींचे मार्गदर्शन लाभल्याने व नेहमी फेसबुकद्वारेच एकमेकांशी संवाद साधणारे प्रत्यक्ष भेटल्यामुळे पंढरीत पार पडलेले पहिले-वहिले फेसबुक मित्र स्नेहसंमेलन ऐतिहासिक ठरले.
कोर्टी येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या फेसबुक मित्र स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षपदी पंढरीतील रंगकर्मी व जेष्ठ फेसबुक मित्र मुरलेंद्र शेटे हे होते. यावेळी माहिती पोलिस अधिक्षक (सायबर क्राईम) बाळसिंग राजपुत, दै. पुण्य नगरी पुणे आवृत्तीचे वृत्तसंपादक श्रीकांत साबळे, निवडणूक तज्ञ वैभव छाया, पत्रकार अशि्वनी सातव-डोके, अभियंता गणेश अटकळे, प्राचार्य कैलास करांडे आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना सायबर क्राईमचे पोलिस अधिक्षक बाळसिंग राजपूत म्हणाले की, ऑनलाईन पध्दतीने माहिती जमा करुन आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. ते टाळण्यासंदर्भातील उपायही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलताना वैभव छाया म्हणाले की, निवडणूक काळात सोशल मिडीया वापरकर्त्यांची माहिती उपयोगात आणली जाते. युवकांचा कल, आवडी-निवडी तपासल्या जातात व सांख्यिकी माहितीच्या आधारे ऑनलाईन सर्व्हेक्षण तसेच माहितीचा प्रभाविपणे वापर या बाबींना महत्व ठरते.
यावेळी बोलताना सुरज भानुशाली म्हणाले की, फेक न्युज ओळखणे तसेच त्या पुढे न पाठविणे याबाबत जागृकता आवश्यक आहे. अभियंता गणेश अटकळे यांनी इंटरनेटची सुरुवात, विविध क्षेत्रात त्याचा होणारा वापर व सायबर गुन्हेगारिविषयी माहिती दिली.
पत्रकार अश्विनी सातव-डोके म्हणाल्या की, सोशल मिडीयाच्या माध्यमातून आत्ता महिला बोलताहेत. परंतु इथंही महिलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. महिलांच्या हक्कांविषयी बोलतानाच पुरुषी अंहकाराविषयी सुध्दा त्यांनी आपले परखड मत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात मुरलेंद्र शेटे यांनी इंटरनेटवरील पॉर्न साईटस्वर आक्षेप घेतला. लहान मुलांच्या मनावर यामुळे विपरीत परिणाम होत असल्याने अशअ साईटस् वर बंदी आणावी असेही ते म्हणाले. यावेळी अनेक फेसबुक मित्रमंडळींनी गायन, कविता वाचन सादर केले. तर अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक नवनाथ पोरे यांनी तर आभार राजू उराडे यांनी मानले. सुत्रसंचालन प्रा. समाधान काळे यांनी केले. या संमेलनासाठी 200 हून अधिक फेसबुक मित्र उपस्थित होते.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments