पंढरपूर LIVE 20 आॅगस्ट 2018
पंढरपूर (प्रतिनिधी):- प्रत्येक सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे समाजसेवक विश्वनाथ पांडुरंग गोरे यांना आ. परिचारक गटाकडून स्वीकृत नगरसेवकपदाची संधी मिळावी. अशी आम्हा सर्वांची मनोमन इच्छा असल्याचे मत प्रभाग क्र. 16 ब मधील अनेक कार्यकर्त्यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना व्यक्त केलंय. सध्या पंढरपूर नगरपरिषदेतील आ. परिचारक गटाचे स्वीकृत नगरसेवक पदे रिक्त झाली असल्याने धनगर समाजातील गोरे यांना संधी मिळावी अशी मागणी होत आहे.
पंढरपूरमधील टाकळी रोड लगतच्या प्रभाग क्र. 16 ब मधील समाजसेवक विश्वनाथ गोरे हे आ. परिचारक गटाचे खंदे समर्थक असून प्रत्येक निवडणुकीत त्यांच्यावर नेत्यांनी सोपविलेली प्रत्येक जबाबदारी तडीस नेण्याचं काम ते करत असतात. त्यांच्या रुपाने धनगर समाजातील एक उमदा समाजसेवक आम्हास लाभला आहे. अनेक सामाजिक कार्यात व विविध सण-उत्सव-जयंती आदी कार्यक्रमांमध्ये त्यांनी दिलेले योगदान मोलाचे असते. ॠषीतुल्य नेतृत्व कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या आशिर्वादाने व सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक, शहर विकास आघाडीचे अध्यक्ष उमेशराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली ते गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवा करत आहेत. नेत्यांनी दिलेली कामगिरी पार पाडण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याव्यतिरिक्त त्यांनी कधीच कोणत्याही राजकीय पदाची अपेक्षा केलेली नाही. परंतु त्यांना जर पंढरपूर नगरपरिषदेमध्ये नगरसेवक म्हणून संधी मिळाली तर आमच्या प्रभाग क्र. 16 ब मधील कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी अधिक बळ मिळेल. व धनगर समाजाचा एक नगरसेवक पंढरपूर नगरपरिषदेमध्ये घेतल्यास निश्चतच धनगर समाजाला न्याय दिल्यासारखे होईल. त्यामुळे त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी नेत्यांनी द्यावी अशी आपली इच्छा असल्याचे मत पंढरपूर लाईव्हशी बोलताना बजरंग माने, माउली देशमुख, सागर कारंडे आदी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
विश्वनाथ पांडुरंग गोरे हे सर्वसामान्य कुटूंबातील व्यक्तीमत्व संघर्षातून उदयास आलेलं आहे. अफाट कष्ट व जिद्दीने त्यांनी आपलं स्वत:चं विश्व निर्माण केलं. शुन्यापासून विश्व निर्माण केलेल्या माणसाला ना हारण्याची भीती असते ना जिंकल्याचा उन्माद चढतो! तसा गोरे यांनीही कधीच आपली सर्वसामान्यांशी जोडली गेलेली नाळ तुटू दिली नाही. नेत्यांचा शब्द कधी खाली पडू दिला नाही. दत्त जयंतीच्या दिवशी मोठा उत्सव ते स्वखर्चाने साजरा करतात. अनेक आरोग्य शिबीरं, अन्नदान, रक्तदान, खाऊ वाटप, पाणपोई आदींच्या माध्यमातून ते सतत समाजसेवेत सक्रीय असतात. बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा, त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहता यावं यासाठी त्यांनी सढळ हाताने आर्थिक मदत करुन अनेक तरुणांना स्वत:चा व्यवसाय थाटण्यासाठी प्रयत्न केले आहेत. संघर्षाच्या काळात त्यांना आ. प्रशांतराव परिचारक व युवा नेते उमेशराव परिचारक यांचा सहवास लाभला आणि त्यांच्या परिसस्पर्शानं विश्वनाथ गोरे यांच्या आयुष्याचं खर्या अर्थानं सोनं झालं. नेत्यांच्या विश्वासास पात्र राहून त्यांनी आजपर्यंत पडद्यामागे राहून यशस्वीरित्या कार्य करण्याची भुमिका वठवलेली आहे. त्यामुळे आ. परिचारक गटाकडून त्यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी नेते नक्कीच देतील अशी आशा मनोज जाधव, अनिल सोनवणे, अमित क्षिरसागर यांनी व्यक्त केली.
सध्या पंढरपूर नगरपरिषदेतील आ. परिचारक गटाचे स्वीकृत नगरसेवक पदे रिक्त झाली आहेत. अनेक इच्छूक त्यादृष्टीने समोरत येत आहेत. त्याचप्रमाणे प्रभाग क्र. 16 ब मधील कार्यकर्त्यातून धनगर समाजाचे समाजसेवक विश्वनाथ गोरे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून आ. परिचारक गटाने संधी द्यावी अशी इच्छा व्यक्त होताना आढळत आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments