प्रभागातील महिला भगिणींसाठी नागपंचमीनिमित्त मिळवून दिला झोक्याचा आनंद..! उमेशराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका सौ. रेणुकाताई घोडके यांचा स्तुत्य उपक्रम

पंढरपूर LIVE 20 आॅगस्ट  2018

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंचमीचा सण म्हटलं की ‘एक तरी झोका’ घ्यावाच अशी इच्छा होणं स्वाभाविकच. परंतु हल्लीच्या धकाधकीच्या काळात झोके बांधणं आणि हा सण साजरं करणं दुरापास्त होत चाललेलं आहेे. खरं तर हा महिलांचा सण, श्रावण सरींसोबत या सणाला सखींसोबत झोक्यात बसून उंच उडण्याची हौस प्रत्येक महिला भगिणीला असतेच. नागपंचमीच्या सणाला आपल्या प्रभागातील महिला भगिणींना व बाळगोपाळांना झोक्यात बसता यावे यासाठी प्रभाग क्र. 16  ब मधील नगरसेविका महिला  व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. रेणुकाताई घोडके यांनी प्रयत्न केले. युटोपियन शुगर्स चे चेअरमन  उमेशराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या प्रभागातील अनेक भागात झोके बांधले. या झोक्यावर बसून मनसोक्त पंचमीच्या सणाचा आनंद घेताना महिला भगिणींसह बाळगोपाळांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहताना आढळत होता.  

आपल्या नेत्यांचा वाढदिवस साजरा केल्याचा आनंद जसा आपणास वाटतो तसाच आपल्या भागातील सर्वसामान्य जनतेलाही मिळावा. या उद्देशाने विविध उपक्रमासोबतच हा झोके बांधण्याचा उपक्रम आम्ही राबविला. प्रभागातील अनेक ओपन स्पेसमधील काटेरी झुडपे काढून या मोकळ्या जागी वृक्षलागवड केलेली आहे. प्रभागातील मुलांना खेळण्यासाठी व जेष्ठ नागरिकांना फिरण्यासाठीची सोय केली आहे. याच जागेत आज नागपंचमीचा सण व आमचे नेते उमेशराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त झोके बांधले. या झोक्यात बसण्याचा मनमुराद आनंद प्रभागातील भगिणींनी घेतला. लहान मुलं तर अतिउत्साहाने झोक्यांचा आनंद घेत होते. हे पाहून समाधान वाटले. एक सेवक म्हणून जनतेची सेवा करण्यात विशेष आनंद वाटतो. असे मत यावेळी महिला  व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. रेणुकाताई घोडके यांनी व्यक्त केलं. 
यावेळी नगरसेवक विवेक परदेशी, समाजसेवक धर्मराज घोडके यांच्यासह प्रभागातील अनेक प्रतिष्ठीत मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.  



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments