शेतकऱ्यांना आत्महत्येनंतर मदत नको तर जिवंतपणीच शेती सुधारणेसाठी उपायांची गरज-शामसुंदर सोन्नर

पंढरपूर LIVE 20 आॅगस्ट  2018


*स्व. मोहनलाल बियाणी स्मृती व्याख्यानमालेत वक्त्यांनी मांडली शेतकऱ्यांची व्यथा*


परळी । प्रतिनिधी

जिवंतपणी शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर मदत देण्यात राजकारणी धन्यता मानतात हे समाजाचे दुर्दैव आहे. शेतकरी जिवानिशी जातो, त्याचे कुटूंब रस्त्यावर येते, मुला-बाळांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो अशा वेळी शासनाची मदत किंवा पॅकेज काय उपयोगाचे असते असा प्रश्न प्रसिध्द व्याख्याते आणि जेष्ठ पत्रकार ह.भ.प.शामसुंदर महाराज सोन्नर यांनी व्यक्त केला.दरम्यान, 700 वर्षापुर्वी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पाण्याचे महत्व एका अभंगातून स्पष्ट करीत जलाशयाची निर्मिती करावी असा संदेश दिला होता. आम्ही आता वारंवारच्या दुष्काळाला वैतागल्यानंतर पाणी बचतीकडे वळालो असून आता गावोगावी दुष्काळ दूर करण्यासाठी, पाणी साठविण्यासाठी हजारो हात राबतात हे खूप महतवाचे असल्याचे सोन्नर म्हणाले. स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या जयंती निमित्त आयोजित स्मृती व्याख्यानमाला कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दै. चंपावतीपत्रचे संपादक नामदेवराव क्षीरसागर तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ साहित्यीक प्रा.मधू जामकर, मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, ऍड.अजय बुरांडे, ऍड.डी. पी.कडभाने, श्री चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती होती.
पुढे बोलतांना ह.भ.प.शामसुंदर सोन्नर महाराज म्हणाले की, शेतकऱ्यांच्या व्यथा आणि कथा आत्मीयतेने जाणून घेणारे ना शासन आहे, ना प्रशासन. गेल्या अनेक वर्षात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, परंतु त्यांच्या कुटुंबियांना आधार देणारे कोणीही पुढे आले नाही. म्हणूनच जी त्या कुटुंबाची स्थिती झालेली असते ती विषद करतांना त्यांनी त्यांची प्रसिध्द असलेली "माझ्या लेकरासंगट नका काढू फुटू...." ही कवीता सादर केली. या कवितेने हजारोंच्या गर्दीने गजबजलेले सभागृह गंभीर झाले होते. आज निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीवर मात करायची असेल तर जलसंधारणाची लोकचळवळ गतीमान झाली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. अनेक कविता आणि संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांचा आधार घेत त्यांनी आजचा दुष्काळ आणि त्यावरचे उपाय विषद केले. जात, धर्म आणि पंथ असे सगळे भेद विसरून एकत्र या अशी शिकवण वारकरी संप्रदायातील संतांनी दिली असून, हीच शिकवण प्रत्येक गावाला पुढे नेऊ शकते असे मत व्यक्त केले. स्वातंत्र्य, समता, न्याय यांच्यासोबतच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी "बंधुता" या तत्वाची शिकवण दिली. म्हणूनच आपण जसे अनेक धर्मग्रंथांचा आदर करतो तसेच आपण संविधानाचा आदर केला पाहिजे असे प्रतिपादन सोन्नर महाराज यांनी केले.
दरम्यान, आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे स्व. मोहनलाल बियाणी मासिक व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफण्यात आले. दै. मराठवाडा साथी, मराठवाडा साहित्य परिषद, परळी पत्रकार संघ, मारवाडी युवा मंच व राधा मोहन साथी प्रतिष्ठाणच्या वतीने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेत वॉटर कप स्पर्धेत परळी तालुक्यातून प्रथम आलेल्या मोहा, द्वितीय इंदिरा नगर व तृतीय भिलेगाव या ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. याचवेळी सायकलींग स्पर्धेत 400 किमी.ची स्पर्धा जिंकणारे सुहास बडे, महसुल दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी गौरव मिळविणारे परळी  उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी सुर्यकांत गायकवाड, जलदूत म्हणून निवड झाल्याबद्दल प्रेमनाथ कदम, स्काऊट गाईडच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रामप्रसाद शर्मा तसेच पाणी  फाऊंडेशनचे समन्वयक प्रशांत इखे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परळी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष दत्तात्रय काळे, संचलन प्रा. राजकुमार यल्लावाड, आभार प्रदर्शन पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष धनंजय आरबुने यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पुजन करण्यात आले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सोमनाथ चॅटर्जी, एम. करुणानिधी, अजित वाडेकर  यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

*नामदेवराव क्षीरसागर*
पत्रकारिता हे समाज प्रबोधनाचं माध्यम असून कै. मोहनलालजी बियाणी यांनी आपले दैनिक मराठवाडा साथी या दृष्टीकोनातून चालविले आहे. शेवटच्या क्षणापर्यंत बियाणी यांनी आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून काम केले. पत्रकारिता प्रबोधन करणारी व शासन प्रणालीवर अंकुश ठेवणारी असावी हे काकाजींचे विचार खरेच पटण्यासारखे असल्याचे दै. चंपावती पत्रचे संपादक नामदेवराव क्षीरसागर म्हणाले. समाजातील चांगल्या माणसाचे, चांगल्या कामाचे कौतुक मराठवाडा साथी व बियाणी परिवाराने नेहमीच केले असून समाजोपयोगी पत्रकारिता कशी असावी याचे मोहनलाल बियाणी हे उदाहरण होऊ शकतात असेही ते म्हणाले.

*मधु जामकर*
स्व. मोहनलाल बियाणी यांनी आपली पत्रकारिता समाजाच्या भल्यासाठी वापरली असून पत्रकारिता हा राजधर्म आहे, समाजाचा तो आरसा आहे हे काकाजींच्या एकुण पत्रकारितेकडे पाहून लक्षात येते. मराठी साहित्य आणि संस्कृतीवर बियाणी यांनी नेहमीच भर दिला असून सर्व क्षेत्रासाठी आपले दैनिक व्यासपीठ कसे ठरेल हे काकाजींनी नेहमीच लक्षपुर्वक पाहीले आहे. मराठवाडा साथी आणि मोहनलाल बियाणी हे परळी व परिसरातील जनतेचे आवडते दैनिक असून आपण समाजाच्या हितासाठी आपली लेखनी खर्च केल्याचे ज्येष्ठ साहित्यीक प्रा. मधु जामकर म्हणाले. त्यांनी साहित्य संस्कृतीच्या काकाजींच्या आवडीबद्दलही सांगीतले



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments