कन्या प्रशालेत पालक सभा उत्साहात संपन्न

पंढरपूर LIVE 21 आॅगस्ट  2018


विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी पालकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे-सुवर्णाताई इंगवले
सांगोला/प्रतिनिधी : आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक कन्या प्रशालेत इ. 9 वी व इ. 10 वी विद्यार्थ्यांच्या पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचे प्रास्ताविक व स्वागत प्रा.सुवर्णा इंगवले यांनी केले. त्याचबरोबर यावेळी मुख्याध्यापिका सुवर्णप्रभा घोरपडे व संस्था सचिव निलकंठ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी पालकांना मार्गदर्शन करताना सुवर्णाताई इंगवले यांनी पालकांनी विद्यार्थ्यांबरोबर सातत्याने संवाद साधून त्यांना येणाऱ्या अडचणीविषयी माहिती दिली. प्रशालेतील शिक्षकांबरोबर पालकांनी आपल्या पाल्याची दैनंदिन दिनचर्चेची माहिती घेवून त्यांनी गुणवत्ता कशाप्रकारे वाढविता येईल. प्रशालेत त्याकरिता विविध उपक्रम आयोजित करुन त्यांच्या सप्तगुणांना वाव देण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी सर्व शिक्षक वर्गाबरोबर पालाकंचाही सकारात्मक सहभाग आवश्यक असल्याचे सांगितले. 
मुख्याध्यापिका सुवर्णप्रभा घोरपडे यांनी विद्यार्थ्यांच्याकरिता असलेले शैक्षणिक उपक्रम व धोरण सांगितले. जादा तासाकरिता विद्यार्थ्यांना पाठविण्यासाठी पालकांचे शंभर टक्के सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकरिता प्रशालेचे सर्व शिक्षक सहकाऱ्यांचे नेहमीच सहकार्य मिळाल्याने अनेक विद्यार्थी उच्चपदावर पोहचल्याचे आवर्जून सांगितले. 
या पालक सभेला शांताराम रणदिवे, वैशाली कोळेकर, श्रीमती जना मासाळ, यांनी प्रशालेच्या गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त करुन विद्यार्थ्यांकरिता उपयुक्त सूचना प्रशालेत केल्या. अनीता दहिवडकर, मुस्कान बागवान, सजाबाई जाधव, अमोल जाधव, आसमॉं इराणी, ललिता उबाळे, सपना वाघमारे, सुनीता कोळेकर, नंदा पवार, रेश्मा निंबाळकर, विद्या बोराटे, या पालकांनीही विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढल्यामुळे संस्था, प्रशालेविषयी असणारी कृतज्ञता व्यक्त करुन यापुढीलही काळात गुणवत्तेत सातत्य राखण्याची सूचना केली. या पालक सभेत मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. शेवटी आभार सुवर्णा इंगवले यांनी मानले.




  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments