तालवाद्यातून शिवमणींचा अद्भुत तालाविष्कार

पंढरपूर LIVE 12 आॅगस्ट  2018


अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या म्हसोबा उत्सवांतर्गत प्रसिद्ध तालवादक शिवमणी यांचे वादन 
वेंकीज उद्योग समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. बी.व्ही. राव व श्रीमती उत्तरादेवी राव यांच्या स्मरणार्थ उत्सव

पुणे : तबला, ड्रमसेट, झेंबे, घुंगरु, झांज, शंख, डमरु यासोबतच बादली, प्लास्टीकचा जार, सुटकेस यांसारख्या पारंपरिक वाद्य नसलेल्या वस्तूंना शिवमणी या तालयोगीचा जादुई स्पर्श झाला आणि त्याच्या मंत्रमुग्ध नादातून वातावरणात एकच रंग भरला. तोंंडाच्या वाफेने आवाज, शंख आणि घुंगरु बादली वाजवून नानाविध वस्तूंमधून मंत्रमुग्ध नाद निर्माण करीत जगप्रसिद्ध तालवादक शिवमणी यांनी आपली कला पुणेकरांसमोर पेश केली. पुणेकरांनी देखील टाळ््यांच्या गजरात त्यांना साथ देत अद््भूत असा तालाविष्कार अनुभवला.  
शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या म्हसोबा उत्सवांतर्गत वेंकीज उद्योग समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. बी.व्ही. राव व श्रीमती उत्तरादेवी राव यांच्या स्मरणार्थ नातूबाग पटांगण येथे राज्यस्तरीय ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवांतर्गत जगप्रसिद्ध तालवादक शिवमणी यांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  होते. यावेळी पराग ठाकूर, नितीन पंडीत, शिरीष मोहिते, डॉ. विजय पोटफोडे, मंदार रांजेकर, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सुर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व कलाकार उपस्थित होते. वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव यांनी उत्सवाला विशेष सहकार्य केले आहे. 
उच्च प्रतीचे ड्रमसेट तबला, झेंबे, घुंगरु, झांजा, शंख, डमरु  वाजवून मंत्रमुग्ध नाद निर्माण करणे ही शिवमणींची खासियत. परंतु ढोल-ताशा पथकांच्या निनादाने ते भारावले  आणि चक्क मंचावरुन खाली येत वादकांसोबत ताशा वाजविला. ढोल-ताशा पथकांच्या वादनाची जगभर कीर्ती पसरत असताना त्यांना देखील ताशा वाजविण्याचा मोह आवरला नाही. शिवमणी यांनी वादकांमध्ये मिसळत ताशा वाजवून त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या खास शैलीत ताशा वादन करुन प्रेक्षकांना देखील मंत्रमुग्ध केले. 
शिवमणी म्हणाले, ढोल ताशा वादकांकडून खूप काही शिकायला मिळाले. वादकांनी वाजविलेल्या वेगवेगळ््या तालातून आज नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. कोणतीही कला जोपासण्यासाठी सराव आवश्यक आहे. त्यामुळे कलेची साधना करायला हवी, असे देखील त्यांनी सांगितले. श्री साक्षी नाशिक ढोल-ताशा आणि कोल्हापूरच्या स्वराज्य ढोलताशा पथकाचे यावेळी सादरीकरण झाले. अश्विनी जोग आणि योगेश सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले. 

*आज रंगणार ढोल-ताशा स्पर्धेची महाअंतिम फेरी -
पद्मश्री डॉ. बी.व्ही. राव व श्रीमती उत्तरादेवी राव यांच्या स्मरणार्थ नातूबाग पटांगण येथे राज्यस्तरीय ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धेची अंतिम फेरी आज (दि.११) रंगणार आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट वाद्यपथकांमध्ये विजेतेपदासाठी चुरस पहायला मिळणार आहे. यासोबतच उत्कृष्ट ढोल वादक, उत्कृष्ट ताशा वादक, तसेच उत्कृष्ट ताल यांची देखील आज निवड होणार आहे. महाराष्ट्रातील विविधरंगी- विविधढंगी ढोल - ताशा वादन ऐकण्याची पर्वणी पुणेकरांना मिळणार आहे. सायंकाळी ६ नंतर महाकरंडकपदासाठी वादन होणार आहे. रात्री ९.३० वाजता बालाजी राव यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण होणार आहे.



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments