भाजपा आमदार प्रशांत परिचारक यांच्या त्रासाला कंटाळून मुख्यमंत्री निवासस्थानासमोर करणार आत्मदहन... पंढरीतील युवा उद्योजक परिमल भाटे यांचा इशारा!

पंढरपूर LIVE 12 आॅगस्ट  2018

परिचारक यांच्यावर दमदाटीचे, फसवणुकीचे व शिवीगाळ केल्याचे गंभीर आरोप... पंढरीतील राजकीय वर्तुळात खळबळ!


 भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक त्यांचे बंधु उमेडश परिचारक आणि पंढरपूर अर्बन बँकेचे अधिकारी यांनी आमची स्थावर मालमत्ता हडपण्यासाठी माझ्या वडिलांना व मला फसवले आहे. पंढरपूर अर्बन बँकेकडून आम्ही घेतलले कर्ज फेडण्याची आमची तयारी असूनही कर्जफेड करुन घेतली जात नाही. कोर्टाचा आदेश असूनही परिचारकांच्या दबावाखाली पंढरपूर पोलिस स्टेशन आमच्या तक्रारीची दखल घेत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या गृहखाते आहे. त्यामुळे त्यांनीच आत्ता मला व माझ्या कुटूंबाला न्याय देणं अपेक्षित आहे. परंतु आम्हाला अद्याप न्याय मिळालेला नाही. याच्या निषेधार्थ आपण 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला असल्याची माहिती परिमल अविनाश भाटे या युवा उद्योजकाने दिली आहे. भाटे यांनी परिचारक यांच्यावर दमदाटीचे, फसवणुकीचे व शिवीगाळ केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. परिमल भाटे यांनी दिलेल्या या इशार्‍यानंतर व परिचारक यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे पंढरपूरमधील राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे. 

परिमल भाटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही दि. 29 मार्च 2004 रोजी अर्बन बँकेकडे गहाण टाकलेल्या मालमत्तेच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करुन जी मालमत्ता दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार दि. 28 एप्रिल 2011 रोजी आमच्या नावावर झाली, ती मालमत्ता 2004 च्या कागदपत्रावर लिहिली गेली. तसेच आमच्या नावावर नसलेली मालमत्ता जी आजतागायत अस्तित्वातच नाही ती लिहीली गेली. याविरुध्द पंढरपूर पोलिस ठाण्याकडे तक्रार केली असता याची दखल पोलिसांनी घेतली नाही. त्यामुळे दि. 16 एप्रिल 2016 रोजी आम्ही कोर्टाकडे न्याय मागण्यासाठी तक्रार केली. बँकेचे चेअरमन प्रशांत परिचारक, संचालक मंडळ व अधिकारी यांच्या विरुध्द न्यायमुर्तींना तथ्य आढळून आल्याने सदर केस पी.सी. 202 कलमान्वये तपासणी व्हावी म्हणून मा. कोर्टानी पंढरपूर पोलीस स्टेशनला पाठवले. परंतु त्यावर कोर्टाकडून वारंवार रिमायंडर पाठवूनही कोर्टाच्या आदेशाची दखल पोलिस घेतली नाही. पंढरपुरातील हिमराज या आमच्या शितगृहाचा परस्पर लिलाव केला. मात्र पुण्यातील डीआरटी’ या न्यायाधिकरणाने हा लिलाव बेकायदा ठरवत आमच्या बाजूने निकाल दिला. तरीही आमदार प्रशांत परिचारक व त्यांचे बंधू उमेश परिचारक यांच्याकडून त्रास सुरूच आहे. या दोघांविरोधात पंढरपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली तरी पोलीस दबावाखाली काम करीत आहेत. 

आपल्यासारखा अन्याय झालेले अन्य दहा ते पंधरा लोक आहेत. मात्र परिचारक बंधूंच्या दहशतीला कंटाळून ते पुढे येत नाहीत, असा दावा भाटे यांनी केला आहे. पंढरपूर अर्बन बँकेककडून घेतलेल्या गहाण खत कर्जाच्या कागदपत्रात परस्पर बदल करून आमची मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप भाटे यांनी केला आहे. 

या सार्‍या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतरही पंढरपूरमधी पोलीस यंत्रणा कोणतीच कार्यवाही न करता परिचारक यांना मदत करण्याचे काम करीत आहे. उलट आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करूनदेखील जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत आहे. अनेक पातळ्यांवर आमची कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणीच दखल घेत नाही. त्यामुळे नाईलाजाने येत्या स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा इशारा भाटे यांनी दिला आहे. 



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments