संविधान जाळणाऱ्या आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची आम्ही भारतीय नागरिक समस्त पंढरपूरकरांची मागणी

पंढरपूर LIVE 12 आॅगस्ट  2018


पंढरपूर (प्रतिनिधी)- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला  दिलेल्या संविधानामुळे भारताचे स्वातंत्र्य आणि  लोकशाही अभेद्य  राहिली आहे. विश्वातील सर्वश्रेष्ठ भारतीय संविधानाला दिल्लीतील जंतर मंतर येथे जाळण्याचे अत्यंत निंदनीय निषेधार्ह कृत्य काही देशद्रोह्यांनी केले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही अवमानकारक उल्लेख करण्यात आल्याचा निंदनीय प्रकार घडला आहे. या निंदनीय  कृत्याचा आम्ही भारतीय नागरिक समस्त पंढरपूरकर च्यावतीने आपण तीव्र निषेध करीत असून संविधान जाळणाऱ्या देशद्रोह्यांना त्वरीत अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी आम्ही भारतीय नागरिक समस्त पंढरपूरकरच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिक्षक पंढरपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर ऍड.किर्तीपाल सर्वगोड, मोहन अनपट, नागेश भोसले, सचिन डांगे, दिपक वाडदेकर,किरण घाडगे, नवनाथ पोरे, संदिप पाटील, कृष्णा वाघमारे, कैलास उबाळे, अतीश हाडमोडे, अरविंद कांबळे, रामभाऊ गायकवाड, नितीन गायकवाड, विशाल मांदळे,  बापू सर्वगोड, सुनिल चंद्रकांत सर्वगोड,  काका बुराडे, रवि सर्वगोड, किरण सर्वगोड, गुरूदास गाडे, सौरभ गाडे, सागर ढावारे, रूतिक आखाडे, संजय लोखंडे, अतुल वाघमारे,  चेतन कुचेकर, बाळा क्षिरसागर, मनसूर झारी, किशोर खिलारे, भांडारे, बादल यादव, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, भारतीय संविधान ही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला दिलेली अनमोल देणगी आहे. प्रत्येक भारतीयांचे हित संरक्षण करणारे सर्वसामावेशक असे सर्वश्रेष्ठ भारतीय  संविधान आहे. भारतीय लोकशाही चिरायू होण्यासाठी समतेवर आधारित संविधानाची गरज आहे. त्यामुळे भारताची राष्ट्रीय एकात्मता  बंधुता लोकशाही टिकविण्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या  संविधानाचीच देशाला गरज आहे. 
        त्यामुळे संविधानाचे पुस्तक जाळण्याचा ज्या नराधमांनी प्रयत्न केला आहे, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. देशात अराजकता अशांतात माजविण्याचा देशद्रोह्यांचा कट आहे. संविधान जाळणाऱ्या देशद्रोह्यांना त्वरित अटक करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments