संविधान जाळणाऱ्या देशद्रोह्यांवर कठोर कारवाई करा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) युवक आघाडीची मागणी

पंढरपूर LIVE 12 आॅगस्ट  2018

पंढरपूर (प्रतिनिधी)- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला  दिलेल्या संविधानामुळे भारताचे स्वातंत्र्य आणि  लोकशाही अभेद्य  राहिली आहे. विश्वातील सर्वश्रेष्ठ भारतीय संविधानाला दिल्लीतील जंतर मंतर येथे जाळण्याचे अत्यंत निंदनीय निषेधार्ह कृत्य काही देशद्रोह्यांनी केले आहे.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही अवमानकारक उल्लेख करण्यात आल्याचा निंदनीय प्रकार घडला आहे. या निंदनीय  कृत्याचा रिपब्लिकन पक्षातर्फे आपण तीव्र निषेध करीत असून संविधान जळणाऱ्या देशद्रोह्यांना त्वरीत अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) युवक आघाडीच्यावतीने पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.किर्तीपाल सर्वगोड, तालुकाध्यक्ष रामभाऊ गायकवाड, शहराध्यक्ष आतिश हाडमोडे, ता.कार्याध्यक्ष नितीन गायकवाड, ता.सरचिटणीस राहुल गाडे, विशाल मांदळे यांच्यासह आदिंनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत.
भारतीय संविधान ही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला दिलेली अनमोल देणगी आहे. प्रत्येक भारतीयांचे हित संरक्षण करणारे सर्वसामावेशक असे सर्वश्रेष्ठ भारतीय  संविधान आहे. भारतीय लोकशाही चिरायू होण्यासाठी विषमतेवर आधारित  मनुस्मृती ची नव्हे तर  समतेवर आधारित संविधानाची गरज आहे. त्यामुळे भारताची राष्ट्रीय एकात्मता  बंधुता लोकशाही टिकविण्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या  संविधानाचीच देशाला गरज आहे. त्यामुळे संविधानाचे पुस्तक जाळण्याचा ज्या देशद्रोह्यांनी प्रयत्न केला आहे, त्या देशद्रोह्यांवर गुन्हा दाखल करावा.देशात अराजकता अशांतात माजविण्याचा देशद्रोह्यांचा कट आहे. संविधान जाळणाऱ्या देशद्रोह्यांना त्वरित अटक करून  कठोर  शिक्षा करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.
यावेळी विक्रम चंदनशिवे, गोपाळ लोखंडे, दिलीप जाधव, अजय दंदाडे, सुरज साखरे, लखन ढावरे, शकील मुलाणी, भैय्या फडतरे, युवराज माने, भैय्या सर्वगोड, रोहीत वाघमोडे, कैलास ओव्हाळ यांच्यासह आरपीआयचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments