पंढरपूर LIVE 27 आॅगस्ट 2018
मुंबई - मागील काही दिवसांपासून नालासोपारा येथून करण्यात आलेल्या धरपकडी नंतर राज्यभर अनेक ठिकाणी एटीएस’कडून अटक सत्र सुरु झालं होतं. त्यातील अटक करण्यात आलेले सर्वजण हे सनातन संस्थेशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत वैभव राऊतसह इतर आरोपी हे सनातन संस्थेचे साधक नसल्याचा दावा केला आहे.
त्यामुळे या सर्व प्रकरणात सनातन संस्थेने हात झटकल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मराठा आंदोलन व ईदमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा सनातनचा कट होता, असे सर्व आरोपही सनातनने फेटाळून लावले आहेत. काही दिवसांपूर्वी नालासोपारा येथे आढळलेली स्फोटके आणि त्यानंतर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी हात असलेल्या आरोपींना एकामागे एक अटक झाल्यानंतर त्या आरोपींचा सनातनशी संबंध असल्याचा दावा करण्यात येत होता. त्यानंतर सर्वच थरातून सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी पुढे येत होती. त्या पार्श्वभूमीवर आज सनातन संस्थेने मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
पत्रकार परिषदेत बोलताना सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी सांगितलं कि, वैभव राऊतसह अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींचा सनातनशी संबंध नाही तसेच ते सनातनचे साधक सुद्धा नव्हते, तपासात सनातनचे थेटपणे नाव आलेले नाही. मराठा आंदोलन तसेच ईददरम्यान स्फोट घडवण्याचा सनातनचा हेतू होता त्यामुळे हा आरोप धादांत खोटा आहे असे राजहंस यांनी म्हणाले. तसेच सनातनबाबत प्रसारमाध्यमांमध्ये खोट्या बातम्या येत असून, अशा बातम्या प्रसारित करणाऱ्यांविरोधात थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सनातनकडून देण्यात आला आहे. त्यामुळे एकूणच सनातन संस्थेने या संपूर्ण प्रकरणातून अंग काढून घेतल्याचे बोललं जात आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments