पांडुरंगाच्या महाद्वारात पुंडलिका वरदे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात आज गरजला सकल मराठा समाज...

पंढरपूर LIVE 9 आॅगस्ट  2018



पंढरपूर शहर व उपनगरात सर्वत्र कडकडीत बंद... सकल मराठा समाजाच्या बंदच्या हाकेला पंढरपूरकराचा 100 टक्के प्रतिसाद... कांही ठिकाणी टायर जाळण्याचे अपवाद वगळता सर्वत्र शांततेत झाले मराठ्यांचे आंदोलन!

आज 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी सकल मराठा समाजाच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन पार पडले. पंढरपूर शहर व तालुक्यातही सर्वत्र हे आंदोलन झाले. सकल मराठा समाजाच्या वतीने केलेल्या बंद च्या आवाहनाला पंढरपूरमधील सर्व व्यापार्‍यांनी 100 टक्के प्रतिसाद देऊन पंढरपूर शहर कडकडीत बंद ठेवल्याचे दिसून आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोड, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,  स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, बसस्थानक परिसर, इंदिरा गांधी चौक, पंढरपूर-पुणे रोड, डीव्हीपी मल्टीप्लेक्स थिएटर व मॉल, प्रबोधनकार ठाकरे चौक, लिंक रोड, क्रांतीसिंह नाना पाटील चौक, कर्नल भोसले चौक, अर्बन बँक, नगरपरिषद, चौफाळा, गांधी रोड, नाथ चौक, तांबडा मारुती, प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर, कालिकादेवी चौक, म.फुले चौक, सांगोला चौक, भक्तीमार्ग आदींसह संपुर्ण पंढरपूर शहर व उपनगरातील सर्व भागातील दुकाने बंद ठेवुन व्यापार्‍यांनी या बंदला उत्सफुर्तपणे प्रतिसाद दिलेला आढळला. सकल मराठा समाजाच्या वतीने वैद्यकीय सेवा, शैक्षणिक संस्था चालु ठेवण्याचं आवाहन केलेलं होतम त्यानुसार शहरातील मेडीकल व हॉस्पिटल्स सुरु होते. परंतु शैक्षणिक संस्थांनी मात्र या बंदला पाठींबा देऊन सर्व संस्था बंद ठेवल्याचं दिसून आलं. सकल मराठा समाजाच्या वतीने पंढरपूर शहरातून रॅली काढत हा बंद शांततेत पार पाडण्याचं करण्यात आलं होतं. शहरातील कांही चौकांमध्ये टायर जाळण्यात आले. हा अपवाद वगळता सकल मराठा समाजाचं चक्का जाम आंदोलन शांततेत पार पडलं.






  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments