प्रभु सर व पिंगळे साहेब जाताच पुन्हा डोके वर काढण्याच्या तयारीत पंढरीतील गुन्हेगारी... अवैध धंदेवाले जोमात..?

पंढरपूर LIVE 10 आॅगस्ट  2018


आपल्या विशेष पथकाच्या माध्यमातून अवैध धंद्यांना नेस्तनाबुत करणारे सोलापूर जिल्हा ग्रामीण चे दबंग पोलिस अधिक्षक विरेश प्रभु सर व पंढरपूर शहरात डॅशिंग डी.वाय.एस.पी. म्हणून आपल्या नावाचा ठसा उमटविलेले आयपीएस अधिकारी निखील पिंगळे यांची बदली होताच भुवैकुंठ पंढरी नगरीतील दबलेली गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढण्याच्या प्रयत्नात असून अवैध धंदेवाले पुन्हा आपण जोमात राजरोसपणे आपले धंदे करु शकतो! अशा अविर्भावात आपल्या धंद्यांचा जम बसविण्यासाठी जोमाने तयारीला लागल्याची कुणकुण ऐकावयास मिळत आहे. 

एक कर्तव्यदक्ष दबंग पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे सोलापूर जिल्हा ग्रामीण चे दबंग पोलिस अधिक्षक विरेश प्रभु सर यांनी संपुर्ण सोलापूर जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांना सळो की पळो करुन सोडले होते. आपल्या विशेष टीम च्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्चयातील अनेक अवैध अड्यांवर धाडी टाकून त्या अवैध धंदे नेस्तनाबुत केले होते. याचबरोबर आयपीएस अधिकारी निखील पिंगळे यांनी आपल्या पंढरपूरच्या डीवायएसपी च्या पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर उण्यापुरच्या दीड-दोन वर्षाच्या कालावधीत त्यांनी येथील गुन्हेगारीची व अवैध धंदेवाल्यांची पाळेमुळे खणून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अवैध धंदेवाले, भुरटे दादा आणि गुन्हेगार यांच्यावर पोलिसी खाकीची जरब बसविण्यात ते यशस्वी झाले होते. परंतु अचानक या दोन्हीॅ प्रामाणिक पोलिस अधिकार्‍यांची बदली झाली...  पदोन्नतीमुळे प्रभु सर व पिंगळे साहेब जाणार हे समजल्यापासूनच येथील गुन्हेगारी वर्तुळात पेढे  वाटल्याची चर्चाही ऐकावयास मिळाली होती. 

पंढरपूर लाईव्हला सुत्रांकडून सुत्रांकडून मिळालेल्या खात्रीलायक वृत्तानुसार  प्रभु सर व पिंगळे साहेब येथून बदली होऊन जाताच आपल्या बंद पडलेल्या धंद्याचं बस्तान बसविण्यासाठी अवैध धंदेवाले पुन्हा नव्या जोमानं सरसावल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. परंतु पंढरपूरमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक आय.जी. विश्‍वास नांगरे पाटील साहेब यांनी विशेष लक्ष केंद्रीत केल्यामुळे भुवैकुंठ पंढरपूर परिसरात अवैध धंदे चालविणे व गुन्हेगारी वाढविण्याच्या तयारीत असलेल्यांसाठी वाटते तेवढे हे सोप्पे मात्र नक्कीच नसेल. फक्त गरजय नांगरे-पाटील यांच्या आदेशांचं तंतोतंत पालन करत प्रामाणिकपणे खाकीचा धाक दाखवण्याचं कार्य करणारे  तत्कालीन सोलापूर जिल्हा ग्रामीणचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक विरेश प्रभु साहेब व पंढरपूरचे डी.वाय.एस.पी. निखील पिंगळे साहेब यांच्यासारखं कार्य करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांची..! 



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments